“आरोपींवर कडक कारवाई होईलच, पण वयात येतानाच मुलांवर संस्कार करणं गरजेचं”

मुंबई। साकीनाका येथील खैरानी रोड परिसरातील बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. जिकडे तिकडे घडलेल्या घटनेनंतर संतापजनक वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान आता महाविकास आघाडीकडून आरोपींवर कडक कारवाई करु, असं सागितलं जात आहे. दुर्दैवाने पीडित महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेवर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आता महाविकास आघाडीकडून आरोपींवर कडक कारवाई करु, असं सागितलं जात आहे.

मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आता याबाबत वेगळीच शंका व्यक्त केली आहे. वयात येणाऱ्या प्रत्येक मुलांवर संस्कार होणे गरजेचे असल्याचे रूपालीताई म्हणाल्या आहेत.

रुपालीताई म्हणाल्या आहेत की, साकीनाकामधील घटना निंदणीय, संतापजनक आहे. आपण नेहमी निर्भया झाल्यानंतरच आपण चर्चा करणार आहोत का? त्यानंतर कँडल मार्च, निषेध नोंंदवणार आहे का? अशा घटना घडल्यानंतर 4-5 दिवस चर्चा करतो आणि विसरुन जातो. पुढे अशा घटना घडू नये म्हणून चर्चा करतो. मात्र ठामपणे भूमिका घेणं गरजेचे आहे.

कायदे आहेत, कायद्याचं राज्य आहे. पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. पण घरातील संस्कार महत्वाचे झाले आहेत. आज नाती विसरुन बाप मुलीवर, भाऊ बहिणीवर बलात्कार करतो. वयात येणाऱ्या मुलांवर संस्कार करणं महत्वाचं आहे, असं मत रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

आमच्या खासदारांनी केंद्राला अनेकदा पत्र पाठवली आहेत की, पोर्नोग्राफी वेबसीरीज वाढलेत त्याला कुठे तरी आळा घालावा. वयात येणारी मुलं, समाजातील जनमाणस आजुबाजूला घडणाऱ्या घटना पाहतात त्याचं अनुकरण करायला जातात. ही वाढती विकती बंद झाली पाहीजे.

शालेय जीवनात लैंगिक शिक्षणाचा प्रभावी वापर करुन वयात येणाऱ्या मुलांवर संस्कार करण्याची गरज आहे, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मुंबईतील साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात ३२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. व त्यानंतर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

या घटनेत पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन देताना, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुंबईतील कोर्टाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.