Bhide Guruji : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे, प्रसिद्ध भिडे गुरुजी, यांच्यावर एका भटक्या कुत्र्याने(dog) हल्ला केल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे. सोमवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास भिडे गुरुजी एका धारकऱ्याच्या घरी भोजन कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रम संपवून परतत असताना माळी गल्ली परिसरातून जाताना एका भटक्या कुत्र्याने त्यांच्या पायाला चावा घेतला.
या घटनेनंतर भिडे गुरुजींना(Bhide Guruji) तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. भिडे गुरुजींचं वय सध्या 80 वर्षांपेक्षा अधिक असून, ते सांगलीतच(sangli) वास्तव्य करत आहेत.
या घटनेनंतर महापालिकेकडून तत्काळ प्रतिक्रिया देण्यात आली असून, माळी गल्ली परिसरात भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सांगली महापालिकेच्या डॉग व्हॅन पथकाने ही मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.
संभाजी भिडे(sambhaji bhide) यांनी 1980 च्या दशकात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेची स्थापना केली होती. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि उत्तर कर्नाटक परिसरात या संघटनेचं सक्रीय कार्य चालतं. त्यांच्या संघटनेतर्फे आयोजित होणाऱ्या दुर्गामाता दौड आणि गड-किल्ल्यांवरील उपक्रम सातत्याने चर्चेत असतात.
या घटनेमुळे भिडे गुरुजींच्या(Bhide Guruji)अनुयायांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे, तर महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर उपाययोजना करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
stray-dog-attacks-bhide-guruji