कोरोनाला ९०व्या वर्षी दोनदा हरवणाऱ्या या पैलवणाची कहाणी माहितेय का.? जाणून घ्या

बीड । कोरोनाने राज्यात सर्वत्र हाहाकार उडवला आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेकजनांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. असे असताना बीड जिल्ह्यातल्या आडस गावच्या एका नव्वद वर्षाच्य पैलवानाने एकदा नव्हे तर दोनदा कोरोनावर मात केली आहे.

यामुळे एक कोरोना विरोधात लढण्यासाठी बळ देणारी आणि मनातील कोरोनाची भीती घालविणारी घटना अंबाजोगाईमध्ये घडली आहे. आडसचे पांडुरंग आत्माराम आगलावे असे या आजोबांचे नाव असून त्यांचे वय ९० आहे. त्यांना दोनदा कोरोना झाला आहे

त्यांना १३ नोव्हेंबर २०२० रोजी पहिल्यांदा कोरोना झाला. केज येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन ते ठणठणीत होऊन आपल्या घरी परतले. ते पूर्वी पैलवान असल्याने अजुनही ठणठणीत आहेत.

त्यांनी लस घेतली देखील घेतली होती. ३ एप्रिल रोजी पुन्हा कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. ही सहा महिन्यातील दुसरी वेळ होती. मात्र यावेळी त्यांना जास्त त्रास झाला. घरचे घाबरून गेले होते, मात्र ते जुन्या काळातील पैलवान शरिरातील बळ संपले तरी मन घट्ट असल्याने पुन्हा बरे झाले.

त्यांना पूर्वीचा कोणताही आजार नाही. दररोज ते तीन किलोमीटर फिरायला जातात. यामुळे ते ठणठणीत आहेत. त्यांना कोणतेही व्यसन नाही. कोरोनाला घाबरणारे शकतो दगावत आहेत.

शरीराने ठणठणीत असणारे आणि मनाने मजबूत आणारेच यावर मात करत आहेत. राज्यात रोज 60 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. यामुळे आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

ताज्या बातम्या

राज्यात आजपासून कडक निर्बंध लागू, आता कुठेही फिरता येणार नाही, जाणून घ्या नवीन नियम

जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या मुलाला तुरूंगातून पळवण्यासाठी आईने खोदले ३५ फूट लांबीचे भुयार

गृहमंत्र्याच्या नावे ५ लाखांची खंडणी मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची होणार चौकशी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.