सुनील दत्तकडे १५०० रूपयांवर काम करायचे शक्ती कपूर, पण मर्सिडीज ठोकली अन् नशीबच पालटले

फिल्म इंडस्ट्रीमध्ये संधी येतात की आपल्या जीवनाला कलाटणी देऊन जातात. तो कलाटणी देणारा क्षण कधी, केव्हा आणि कुठे येईल हे सांगता येत नाही. असेच बॉलीवूडच्या एका खास अभिनेत्यासोबत झाले होते.

त्या अभिनेत्याने त्या संधीचा फायदा घेतला. त्यामूळे ते आज बॉलीवूडचे आघाडीचे अभिनेते आहेत. हे अभिनेते आहेत शक्ती कपूर ते बॉलीवूडचे विनोदी अभिनेते त्यासोबतच एक जबरदस्त खलनायक देखील आहेत.

शक्ती कपूर यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी खुप मेहनत केली होती. त्यांना अनेक आर्थिक अडचणीत येत होत्या. चित्रपटसृष्टीत आल्यानंतर नवखे असल्याने त्यांना काम मिळत नव्हते.

पैशांची चणचण होतीच. अशा कठीण काळात अभिनेते सुनील दत्त यांनी शक्ती कपूर यांना आधार दिला होता. सुनील दत्त त्यांना त्याकाळी १५०० रूपये महिना देत होते. यामुळे शक्ती यांचा महिनाभराचा खर्च भागायचा.

अभिनेते विनोद खन्ना यांच्या घरी शक्ती कपूर जवळपास ५ वर्षे राहिले होते. शक्ती कपूर फिल्म इंडस्ट्रीत आले तेव्हा त्यांचे नाव सुनील होते. सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांनीच त्यांचे शक्ती असे नामकरण केले.

पुढे शक्ती कपूर यांची फिरोज खान यांच्यासोबत भेट झाली आणि त्यांना ‘कुर्बानी’ सिनेमा मिळाला. या चित्रपटानंतर शक्ती कपूर स्टार झाले. कुर्बानी हा चित्रपट शक्ती कपूर यांनी अपघाताने मिळाला होता.

शक्ती कपूर यांची अभिनेता बनण्याची गोष्ट खूप इंट्रेस्टिंग आहे. काही वर्षांपूर्वी शक्ती कपूर सामान खरेदी करून लिकिंग रोडहून दक्षिण मुंबईच्या रस्त्यावर जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीची एका मर्सिडिजशी टक्कर झाली.

जेव्हा ते गाडीतून उतरले. तेव्हा एक उंच देखणा माणूस मर्सिडिजमधून बाहेर पडताना दिसला. ते दुसरे कोणी नव्हे तर फिरोज खान होते. त्यांना गाडीतून बाहेर येताना बघून शक्ती कपूर थोडे हादरले.

पण ते हिम्मत करून म्हणाले की, ‘सर, माझे नाव शक्ती कपूर, मी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचा डिप्लोमा घेतला आहे. कृपया मला तुमच्या चित्रपटात भूमिका द्या. फिरोज खान यांनी हे ऐकले आणि ते गाडीत बसून निघून गेले.

त्यानंतर काही दिवसांनी शक्ती कपूर त्यांचे मित्र के. के. शुक्ला या जिवलग मित्राच्या घरी गेले होते. तो लेखक होता आणि तो फिरोज खान यांच्यासोबत ‘कुर्बानी’ चित्रपटावर काम करत होता.

शक्ती कपूर गेले तेव्हा त्याने त्यांना सांगितले की, ‘फिरोज खान चित्रपटातील एका विशिष्ट भूमिकेसाठी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधील एका माणसाच्या शोधात आहेत. जो त्यांच्या गाडीला आज धडकला होता.’

हे ऐकून शक्ती कपूर खूप खूश झाले आणि म्हणाले, मीच तो माणूस. त्यांच्या मित्राने लगेचच फिरोज खान यांना फोन केला. त्यांना या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

१९७२ साली ‘कुर्बानी’ चित्रपटातून शक्ती कपूर यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. कुर्बानीमधून भेटलेल्या यशानंतर शक्ती कपूर यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

मिळालेल्या चित्रपटात त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर शक्ती कपूर यांनी इंडस्ट्रीत आपले वेगळे स्थान निर्माण केले. आज ते आघाडीचे अभिनेते आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.