पत्रकार अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी दोषी ठरवत मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोस्वामी यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक नेत्यांकडून आणीबाणीची स्थिती असल्याचे म्हटले जात आहे.
भाजपच्या अनेक नेत्यांकडून मुंबई पोलिसांचा विरोध केला जात आहे. पण तुम्हाला २००२ मध्ये झालेल्या ‘पत्रकार रामचंद्र छत्रपती’ यांच्या हत्येबद्दल माहितीये का? बाबा राम रहीम यांच्या विरोधात मोठा खुलासा केल्याने त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
रामचंद्र हे वकील होते, मात्र २००० मध्ये त्यांनी सिरसा येथे ‘पूरा सच’ नावाचे सायंकालीन दैनिक सुरू केले. अशात २००२ मध्ये रामचंद्र यांना निनावी पत्र मिळाले.
बाबा राम रहीम यांच्याविरुद्ध त्यांच्याच डेऱ्यातील दोन महिलांनी हे पत्र लिहले होते. त्यात डेरामध्ये साध्वींचे लैंगिक शोषण होत असल्याचे लिहले होते. त्यांनी ते पत्र आपल्या दैनिकात छापले तर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या.
पण रामचंद्र हे माघार घेणारे पत्रकार नव्हते. रामचंद्र यांनी साध्वींसोबत झालेल्या अत्याचाराचा खुलासा केला होता. अखेर १९ ऑक्टोबर २००२ रोजी रामचंद्र यांना त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडण्यात आल्या.
त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात ते शुद्धीवर देखील आले होते, मात्र राजकीय दबावामुळे त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला नाही, अखेर २१ ऑक्टोबर रोजी त्यांचा अपोलो रुग्णालयात मृत्यू झाला.
२००३ मध्ये रामचंद्र छत्रपती यांच्या हत्यप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर २००६ मध्ये हे प्रकरण सीबीआयला सोपविण्यात आले होते. ऑगस्ट २०१७ मध्ये बाबा रामरहीम यांना बलात्काराप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्यांना २० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.