MDH वाले आजोबा माहितीयेत? एकेकाळी टांगा चालवायचे, कसे काय बनले मसाला किंग? वाचा..

‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते. गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. आज पहाटे ५.३८ वाजता निधन झाले. पण त्यांनी इतकी मोठी एमडीएच मसाल्याची कंपनी कशी उभी केली याची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. तीच कहाणी आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

सध्याच्या काळात जे लोक स्वयंपाक घरात काहीतरी नवीन पदार्थ करण्याच्या तयारीत असतात त्यांच्यासाठी MDH मसाल्याचे पाकीट एका जादुसारखे आहे. MDH पावभाजी मसाला तर भाजीच्या स्वादाला दुप्पट बनवतो. MDH मसाला आजच्या काळात अनेक गृहिणींचा विश्वास आहे.

मसाल्याच्या पॅकेटवर जे पगडी घालून आणि पांढरी शेरवानी घालून हसणारे आजोबा त्यांना विश्वास देतात की, तुम्ही कोणतीही डिश बनवा तुमच्या डिशला स्वाद आलाच म्हणून समजा. तुम्ही याला कल्पना समजा पण MDH मसाल्याचे रंगीत पॅकेट लाखो लोकांच्या स्वयंपाक घराचा हिस्सा बनला आहे.

MDH म्हणजे महाशियान दी हट्टीची स्थापना १९१९ मध्ये भारताचा अविभाज्य घटक असलेल्या सियालकोट क्षेत्रमधील चुन्नी लाल गुलाटी यांनी केली होती. अनेक वर्षे त्यांनी छोट्या कंपनीचे रूपांतर मोठ्या कंपनीमध्ये करण्यासाठी खूप कष्ट केले आहेत. यामागे त्यांचा एकच हेतू होता की, सुगंधित भारतीय मसाल्याचे योग्य मिश्रण.

या कंपनीने ६४ प्रोडक्ट बाजारात आणले त्यात मिट मसाला कस्तुरी मेथी, गरम मसाला, राजमा मसाला, दाल मखणी मसाला, भाजी मसाला इ. प्रॉडक्ट आहेत. ६४ प्रॉडक्ट काढल्यानंतर या कंपनीने २०१७ मध्ये ९२४ करोड रुपयांचा नफा कमावला होता. १०० पेक्षा जास्त देशात या मसाल्यांची निर्यात होते.

गुलाटी यांनी रस्त्यावर फेरी वाल्याचे तसेच आरसा विकण्याचे कामही केले आहे. तुम्ही असं म्हणू शकता की, आजोबा आपल्या काम आणि मेहनतीने करोडपती झाले. त्यांनी खूप लवकर ओळखले होते की मसल्याद्वारे आपण एका गृहिणीचे जीवन किती सोपे बनवू शकतो.

गुलाटी यांचा जन्म १९२३ मध्ये सियालकोट (पाकिस्तान) येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव महाशय चुन्नीलाल आणि आईचे नाव माता चनन देवी होते. त्यांचे लहानपण शाळेत, कधी नदीवर गुरांसोबत, आखाड्यात कुस्ती खेळताना किंवा वडिलांबरोबर दूध विकायला मदत करण्यात गेले.

त्यांना शिक्षणात जास्त रस नव्हता. त्यांनी पाचवीनंतर शाळा सोडून दिली आणि आपल्या वडिलांच्या कामात हातभार लावण्यास सुरुवात केली. त्यांचे वडील आरसे विकायचे नंतर त्यांनी साबण विकायचे काम सुरू केले होते. पुढे त्यांनी हार्डवेअर, कपडे, राईड ट्रेडिंग ही कामे सुद्धा सुरू केली. तरुणपणी मिळालेला हा अनुभव त्यांना पुढे खूप उपयोगी पडणार होता.

नंतर वडील मुलाच्या जोडीने महाशियान दी हट्टी या नावाने मसाल्याचे दुकान टाकले. ते दुकान नंतर देगी मिरची वाले नावाने प्रसिद्ध झाले. पण फाळणीच्या काळात त्यांना आपले सगळे समान सोडून दिल्लीमध्ये यायला लागले. एका रिपोर्टनुसार जेव्हा गुलाटी दिल्लीमधे आले तेव्हा त्यांच्या खिशात फक्त १५०० रुपये होते.

मग त्यांनी १५०० रुपये मधील ६५० रुपयांत एक टांगा खरेदी केला आणि ते नवी दिल्ली रेल्वे स्टेशन ते कुतुब रोड आणि करोल बाग पर्यंत लोकांना फक्त २ आणे रुपये घेऊन सोडत होते. पण त्यांना काहीतरी वेगळे करायचे होते. त्यांना माहीत होते मसाल्याच्या व्यापारात त्यांना खूप कमाई होऊ शकते. कारण त्यांनी ते काम आधी केले होते.

त्यांनी त्यासाठी आपला टांगा विकून टाकला आणि करोल बाग परिसरात एक लाकडाचे छोटे दुकान खरेदी केले. त्यांनी परत आपला महाशियान दी हट्टी, देगी मिरची वाले हा बोर्ड त्या दुकानाला लावला. पुढील काही वर्षात त्यांनी आपल्या भावाच्या मदतीने तेथील परिसरात जाहिरात करण्यास सुरुवात केली आणि खूप नाव कमवले.

भारतात सर्वात जास्त मसाला कोणत्या भागात विकला जातो याचे त्यांनी अनुमान लावले आणि तिथे दुकाने खोलण्यास सुरुवात केली. १९५३ मध्ये त्यांनी दिल्लीमध्ये पाहिले आधुनिक दुकान खोलले.

आधीपासून असा समज होता की, घरी बनवलेला मसाला सगळयात चांगला असतो. अशा प्रकारच्या मान्यतेला तोडणे खूप कठीण काम होते. जसा जसा बिझनेस वाढत गेला तसं तसं त्यांनी आपल्या ब्रँडला दुसऱ्या ब्रँडच्या तुलनेत वेगळं दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी जाहिरातींवर जोर दिला.

त्यांचे म्हणणे होते की, जाहिरात अशी असायला हवी त्याकडे लोक आकर्षित झाले पाहिजेत. त्यांनी कार्डबोर्ड पॅकेट बाजारात आणायला सुरुवात केली. त्याच्यावर हायजेनिक, फुल ऑफ फ्लेवर अँड टेस्ट असे शब्द लिहिलेले होते. बिना डिग्री आणि बिना मार्केटिंगवाल्या व्यक्तीने आपला फोटो त्या बॉक्सवर लावला. महत्वाची बाब ही आहे की, आजही पॅकेट तसेच आहे फक्त काही बदल झाले आहेत.

त्यांनी कधी विचारही केला नव्हता की, एक मिशिवाले आजोबा इतके मोठे ब्रँड बनून जातील. स्वतःचा फोटो पॅकेटवर लावण्यामागे एक कारण होते. त्यांचे म्हणणे होते की, ग्राहकांना माहीत असले पाहिजे ते कोणाचे मसाले खरेदी करत आहेत. याद्वारे ग्राहकांबरोबर एक कनेक्शन त्यांना बनवायचे होते. आणि ते त्याच्यात यशस्वी झाले.

हे ही वाचा

साराचा कि.सींग सिन पाहून वडील सैफ अली खानने दिली धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाला…

छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत पुन्हा एकदा दिसणार डॉ. अमोल कोल्हे…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.