मी तुझं लफडं माफ करतो पण…, वाचा एका स्त्रीची हृदयद्रावक कहाणी

एका महिलेने रिलेशनशिपबाबत एका पोर्टलवर तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. ही महिला दोन मुलांची आई आहे आणि तिचा नवरा तिच्यावर तिसऱ्या मुलासाठी दबाव टाकला आहे. पण तिला तिसरे मुल नको आहे.

महिलेने तिचे दु:ख सांगताना सांगितले की काही दिवसांपुर्वी तिच्याकडून एक मोठी चूक झाली होती. दोन वर्षांपुर्वी तिच्या ऑफिसमध्ये असलेल्या सहकाऱ्यासोबत तिचे नाते जुळले होते. पण आता तिला या गोष्टीचा पश्चाताप होत आहे.

महिला म्हणाली की, तिचे हॅरीवरील प्रेम हळूहळू कमी होऊ लागले. मला वाटले की माझा बॉयफ्रेंड माझ्यावर खरे प्रेम करतो. मी माझ्या आयुष्याची सुरुवात त्याच्याबरोबर करणार होते. पण तो दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवून मला धोका देत होता.

जेव्हा मला हे समजले तेव्हा मी आतून पुर्णपणे तुटले होते. माझे आयुष्य माझ्यामुळेच उध्वस्त झाले आणि या लफड्याची माहिती माझ्या पतीलाही समजली होती. यानंतर तो मनातून पुर्णपणे तुटला होता. परंतु तरीही त्याने मला माफ केले.

आम्ही एकमेकांना समजून घेतले आम्ही आमचे लग्न वाचवले. पण त्याने मला माफ करताना एक अट माझ्यासमोर ठेवली. त्याला तिसरे मुल हवे होते. यामागचे कारण असे होते की त्याला नाते कायम ठेवण्यासाठी आणि विश्वास पटण्यासाठी त्याला तिसरे मुल हवे होते.

मी माझ्या पतीला अनेकवेळा सांगितले की मी पुन्हा अफेअर करणार नाही. मी जे काही केले याचा मला पश्चाताप होत आहे. मला वाटत नाही मी तिसऱ्या मुलाला सांभाळू शकेल. मी आताही भावनिकदृष्ट्या कमजोर आहे.

हॅरिने हट्ट धरला की त्याला तिसरे मुल हवे आहे. मागच्या दोन्ही मुलांचा जन्म झाला तेव्हा मी खुप आजारी पडले होते. तिला दोन मुले सांभाळणे खूप कठीण जात आहे त्यामुळे तिला तिसरे मुल नको आहे. नुकताच तिला तिच्या बॉयफ्रेंडचा मेल आला होता.

त्यामध्ये त्याने माझ्या तब्येतीची विचारपूस केली होती. मी त्याला लगेचच ब्लॉक केले. माझा नवरा हे पाहिल याची मला भिती वाटत होती. त्याचा मेल पाहून मला जुने दिवस आठवले. माझ्या एका चुकीमूळे हॅरीला असुरक्षित वाटत आहे. मी त्याच्या विश्वासाच्या लायक नाही पण मला विश्वासाची गरज आहे, असे ती म्हणाली आहे.

महत्वाच्या बातम्या
बाबो! रिलीजच्या आधीच ‘या’ चित्रपटाने कमवले ३४८ करोड, बाहुबलीचाही रेकॉर्ड मोडला; पाहा ट्रेलर
राज ठाकरेंचा वीज बिलाच्या प्रश्नावर गौप्यस्फोट; ‘शरद पवारांकडे अदानी येऊन गेले अन् सरकारने…’
सात पिढ्या बसून खातील इतकं कमवलयं, तर घाबरता कशाला?”, नसीरूद्दीन शाहांनी बॉलिवूडला सुनावलं
सचिनकडून भारतरत्न सन्मानाचा अपमान; पहिल्यांदाच राजकीय नेत्याकडून टिका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.