फेरारीने केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी शेतकऱ्याने फेरारीहून भारी लॅम्बोर्गिनी बनवली

गाड्या म्हटलं की अनेक तरुणांचा विक पॉईंट. स्वतःच्या हिमतीवर गाड्या घेणारे अनेक तरुण असतात. प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार, ऐपतीप्रमाणे गाड्य घेत असतो. पण लॅम्बोर्गिनी म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांतील एक स्वप्न, जगातील सर्वात महाग आणि आलिशान गाडी हे चित्र डोळ्यासमोर येत.

तुमच्या सर्वांना आवडणाऱ्या लॅम्बॉरगीनीचा जन्म एका अपमानाच्या बदल्यातून झाला होता. आता बदला घेणे ही चांगली गोष्ट नाही पण यातून एवढं चांगलं घडू शकते. तर ये बदला भी अच्छा है! चला तर जाणुन घेऊयात काय आहे हा किस्सा.

फेरुसिओ लॅम्बॉरगीनी हे लॅम्बॉरगीनीचे मालक. कुटुंब जरी शेतकरी असलं तरी फेरुसिओ यांनी शेतीत जुन्या पारंपारीक पद्धतींचा वापर न करता शेतीत नवीन संकल्पना रूजवल्या व आपली शेती फुलवली. त्यांना मेकॅनिकल कामांचा सुध्दा खुप छंद होता.

त्यांना मशिनरींबद्दल प्रचंड आकर्षण वाटत होते. दुसऱ्या महायुध्दात त्यांनी वायुसेनेचे काम पाहिले. युध्दातुन आल्यानंतर त्यांनी आपल्या शेतीसाठी जून्या लष्करी यंत्रांचा उपयोग करून त्यातुन नवीन ट्रॅक्टर बनवून टाकला.

ट्रॅक्टरच्या व्यवसायातुन त्यांना भरपुर प्रतिसाद मिळाला. व ते श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले. त्यांना महागड्या गाड्या चालवण्याचा नाद होता. त्यावेळी फरारी ही कंपनी रेसिंग गाड्या बनवत होती.

फेरुसिओ लॅम्बोर्गिनी यांच्याकडे सुध्दा फरारी व इतर गाड्या होत्या. पण मॅकेनिकलचे ज्ञान असल्यामुळे फरारी चालवताना त्यांना तिच्यात काही कमतरता दिसुन आल्या व काही बदल सुचले.

त्यांनी हे बदल फरारीचे मालक इंजिओ फरारी यांना सांगण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे हे बदल त्यांनी फरारींची भेट घेऊन त्यांना सांगितले. पण फरारी यांनी त्यांचे हे म्हणणे ऐकून न घेता “मला एका ट्रॅक्टर वाल्याने शिकवायची गरज नाही..!”, असे उद्धट उत्तर दिले.

हाच झालेला अपमान घेऊन फेरुसिओ घरी परतले व त्यांनी आपल्या झालेल्या अपमानाचा बदला म्हणून नविन गाडी तयार करण्याचे ठरवले. त्यांनी प्रत्येक गाडीतील योग्य ते घेऊन आपली एक नवीन रेसिंग कार तयार केली.

१९६४ मध्ये ती एका मोटार प्रदर्शनात दाखवण्यात आली. तीचे नाव त्यांनी Lamborghini 350 असे ठेवले. त्यांच्या गाडीला चांगला प्रतिसाद मिळाला नंतर त्यांनी या मॉडेलच नाव बदलून जीटी ३५० असे ठेवले.

तुमच्या स्वप्नातल्या लॅम्बॉरगीनीचा असा झाला जन्म.ही गोष्ट अनेकांना प्रेरणा देईल. तसेच जिद्दी एक शेतकरी एवढी मोठी कार बनवू शकतो, यावरूनच समजून घ्या आपला शेतकरी राजा पण काय कमी नाही!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.