शरद पवारांनाही या गावाला भेट देण्याचा मोह आवरला नाही, वाचा खानजोडवाडीची यशोगाथा

शेतकऱ्यांना जर भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल आणि त्यांना जर पैसै कमवायचे असतील तर ऊस, सोयाबीन, कापसाकडे पाहिले जाते. पण सांगलीतील एक गाव याला अपवाद आहे. त्या गावाचे नाव आहे खानजोडवाडी.

आटपाडी तालुक्यात हे गाव असून येथील शेतकऱ्यांनी डाळिंग उत्पादनात खुप प्रगती केली आहे आणि नाव कमावले आहे. तुम्हाला वाचून अश्चर्य वाटेल पण कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनाही या गावाला भेट देण्याचा मोह आवरला नाही.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना घेऊन शरद पवार या गावात पाहणीसाठी आले होते. त्यांनी या गावातील डाळिंबाच्या बागांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवादही साधला. आज आम्ही तुम्हाला या गावातील शेतकऱ्यांची यशोगाथा सांगणार आहोत.

सांगली जिल्ह्यातील आटपाडीचा परिसर हा दुष्काळी भाग आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना निसर्गाचा अंदाज घेऊन शेती करावी लागते. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले होते.

मात्र खानजोडवाडी येथील शेतकऱ्यांनी पाणी आणि शेतीचे योग्य नियोजन केले आहे. त्यामुळे या गावात डाळिंबाच्या बागा फुलल्या आहेत. खानजोडवाडीतील जवळपास १०० शेतकऱ्यांनी डाळिंबाची लागवड केली आहे. दरवर्षी येथून ९० टक्के डाळिंबाची निर्यात होते.

शेतीच्या योग्य नियोजनामुळे येथील बऱ्याच शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फारसा फटका बसलेला नाही. त्यामुळे इथला शेतकऱ्यांनी यावर्षीही डाळिंबातून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. या शेतकऱ्यांनी कोरोनाकाळातही हार मानली नाही.

त्यामुळे सर्व स्तरातून इथल्या शेतकऱ्यांचे कौतुक होत आहे. हे गाव महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आदर्श आहे, असे शरद पवार या गावाबद्दल बोलताना म्हणाले. पुढे ते म्हणाले की, अनेक वर्षांपुर्वी फळबागांचा समावेश रोजगार हमीत करण्यात आला होता.

त्यामुळे शेतकऱ्यांना याचा खुप फायदा झाला आहे. जिथं पाऊस आणि ऊन कमी आहे तिथे ऊस लावला की तिथला शेतकरी अडचणीत येतो. त्यामुळे कमी पाऊस असलेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी डाळिंबासारख्या जास्त उत्पन्न देणाऱ्या शेतीकडे वळायला हवे असेही शरद पवार म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या
आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला महाराष्ट्रातील कोरोनाचा कहर संपणार; टास्क फोर्सने दिली माहिती
गुड न्युज! फक्त ४ लाखात ह्युंदाईची नवी कोरी अलिशान SUV कार मिळणार; जाणून घ्या फिचर्स
ह्युंदाई लाँच करणार सर्वात स्वस्त SUV कार; मारुती, टाटा, निस्सानलाही देणार टक्कर; किंमत फक्त..
सासरे वारलेत, घरी कोणच नाही, प्लिज अंत्यसंस्कार करा; लेफ्टनंट कर्नलचा कश्मीरमधून पोलीसांना फोन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.