काही जणांसाठी चहा म्हणजे जीव की प्राण असतो. चहा पिण्यासाठी हे लोक बहाणाच शोधत असतात. कधी कधी तर यांच्यामध्ये स्पर्धाच रंगते की कोण जास्त चहा पिणार… पण चहाप्रेमींनो तुम्ही फक्त चहावर जगू शकता का?
म्हणजे अन्न पाण्याला हातही लावायचा नाही फक्त चहाच प्यायचा. तसे पाहायचे झाले तर हे शक्य नाही. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल छत्तीसगढधील एक महिला गेली कित्येक वर्षे झाली ती फक्त चहा पिऊन जगत आहे.
छत्तीसगढमधील कोरिया जिल्ह्यात बदरीया नावाचे गाव आहे. येथे ४४ वर्षांची एक महिला राहते तिचे नाव पल्लवी आहे. पल्लवी गेल्या ३० वर्षांपासून फक्त चहावरच जगत आहे. गेल्या ३३ वर्षांपासून ती फक्त चहावरच जीवंत आहे.
इतकी वर्षे तिने अन्नाला हातही लावला नाही. सुर्यास्त झाल्यानंतर पल्लवी फक्त चहा पिते आणि दिवसभर त्यावर राहते. तिला सगळे चायवाली चाची म्हणून ओळखले जाते. पल्लवी देवी आपल्या माहेरीच राहते.
१९८५ मध्ये तीचे लग्न झाले होते त्यानंतर ती माहेरी गेलीच नाही. तिचे वडील रतिराम यांनी तिच्या सवयीबद्दल सांगितले आहे. ते म्हणाले की, पल्लवी देवी सहावीत होती तेव्हाच तिने जेवण सोडले होते. तर तिचा भाऊ म्हणाला जेव्हापासून मी पल्लवीला पाहतोय तेव्हापासून ती अशीच आहे.
एकदा दुधवाल्याला पैसे देण्यास उशीर झाला होता तेव्हा त्याने खुप सुनावले होते तेव्हापासून तिने काळा चहा पिण्यास सुरूवात केली. असे तिचा भाऊ म्हणाला. इतकी वर्षे झाली ती चहा पिऊन जीवंत आहे आणि तिच्या आरोग्यावर काहीच परिणाम झाला नाही.
ती पुर्णपणे निरोगी आहे. हे पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत. तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला कळवा आणि जर हा लेख आवडला असेल तर पुढे पाठवायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
महत्वाच्या बातम्या
सर्वोच्च न्यायालयाकडून समिती स्थापन करण्याचा सल्ला; शेतकरी नेते म्हणाले…
सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला घेतलं फैलावर; ‘कृषी कायदे स्थगित करा नाहीतर…’