पाब्लो एस्कोबार: कहाणी अशा श्रीमंत गुन्हेगाराची ज्याचे करोडो रूपये वाळवी लागल्यामुळे वाया जायचे

जगभरात असे बरेच गुन्हेगार होते, जे काही खास कारणांमुळे लोकांमध्ये खूप प्रसिद्ध झाले. असाच एक गुन्हेगार होता जो अवैध औषधांचा व्यापार करीत असे. जगात अवैध औषधांचा व्यवसाय इतका जुना आणि मोठा आहे की त्याचा अंदाज लावला जाऊ शकत नाही.

परंतु आज आम्ही तुम्हाला अशा ड्रग्स माफियाबद्दल सांगणार आहोत ज्याने त्याच्या मध्ये येणाऱ्या हजारो लोकांना ठार केले होते. असे म्हणतात की या माफियाकडे इतके पैसे होते की दरवर्षी कोट्यावधी रुपये तर उदरांनी कुरतडल्यामुळे किंवा वाळवी लागल्यामुळे खराब होत असत.

आम्ही माफिया पाब्लो इमिलियो एस्कोबार गॅव्हिरिया या ड्रग्ज माफियाबद्दल बोलत आहोत. यूएस ड्रग एन्फोर्समेंट ऍडमिनिस्ट्रेशनचे एजंट स्टीव्ह मर्फी यांनी एका मुलाखतीत सांगितले की पाब्लो एस्कोबारकडे पैशाचा प्रचंड साठा होता.

त्याने आपल्या शत्रूंना ठार करण्यासाठी सुमारे १६ अब्ज रुपये खर्च केले होते. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण पाब्लो हा जगभरात कोकेनचा राजा म्हणून ओळखले जात होता. १९८९ मध्ये, प्रतिष्ठित फोर्ब्स मासिकाने पाब्लो एस्कोबारला जगातील सातवे श्रीमंत व्यक्ती म्हणून नाव दिले होते.

त्यावेळी पाब्लोची अंदाजित वैयक्तिक संपत्ती अंदाजे २५ अब्ज अमेरिकी डॉलर किंवा अंदाजे १८२५ अब्ज रुपये होती. याशिवाय पाब्लोकडे जगातील अनेक देशांमध्ये अनेक लक्झरी वाहने व शेकडो घरे होती.

पाब्लो एस्कोबार १९७० च्या दशकात बेकायदेशीर व्यवसायात आला आणि अल्पावधीतच एक प्रसिद्ध माफिया बनला. त्याने सरकारवर दबाव आणून त्यावेळी स्वत: साठी खास तुरूंग तयार केला होता यावरून आपण त्याचे सामर्थ्य किती होते याचा अंदाज लावू शकता.

जेलच्या काही किलोमीटरच्या आत पोलिस येऊ शकत नाहीत अशी अट त्याने घालून दिली होती. पाब्लोशी संबंधित एक किस्सा खूप लोकप्रिय आहे. १९८६ मध्ये पाब्लोने कोलंबियाच्या राजकारणात जाण्याचा प्रयत्न केला होता.

यासाठी त्यांनी देशाचे १० अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ७५० अब्ज रुपयांचे राष्ट्रीय कर्ज फेडण्याची ऑफर दिली होती. याशिवाय, एक किस्सा आहे की एकदा पाब्लो प्रवासात असताना त्याला खुप थंडी वाजत होती. अशा परिस्थितीत त्याने थंडीपासून वाचण्यासाठी दोन दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे १५ कोटी रूपये जाळून टाकले होते.

पाब्लो एस्कोबारचा भाऊ रॉबर्टो एस्कोबारच्या मते, पाब्लो फक्त नोटांच्या बंडल बांधण्यासाठी दर आठवड्याला १००० डॉलरचे रबर बॅन्ड खरेदी करत असे. कोलंबियाच्या सरकारी कर्मचार्‍यांसाठी पाब्लोचे एकच तत्व होते, ‘एकतर लाच घ्या किंवा गोळी खा’.

अशा परिस्थितीत त्याने बर्‍याच लोकांना ठार केले. पाब्लोमुळे कोलंबिया जगातील ‘मर्डर कॅपिटल’ बनले. देशात सतत झालेल्या संघर्षामुळे हजारो लोकांनी आपला जीव गमावला. पाब्लो एस्कोबार कोलंबिया सरकार आणि अमेरिकेचा शत्रू असला तरी तो मेडेलिनच्या कोलंबियन शहरात ‘रॉबिन हूड’ म्हणून प्रसिद्ध होता.

तो अनेकदा गृहनिर्माण प्रकल्प आणि इतर सार्वजनिक उपक्रमांद्वारे गरिबांना पैशाचे वाटप करीत असे. तो मेडेलिनच्या गरीब लोकांसाठी नायकापेक्षा कमी नव्हता. पाब्लोकडे ८०० हून अधिक घरे होती. फ्लोरिडाच्या मियामी बीचवर अमेरिकेत ६५०० चौरस फूट बंगला त्याच्या मालकीचा होता.

इतकेच नाही तर त्याने आयरे ग्रान्डे नावाचे कोरल बेट कॅरेबियनमध्ये विकत घेतला होते. एक वेळ अशी होती जेव्हा पाब्लोने अमेरिकेत पुरविल्या जाणाऱ्या ८० टक्के कोकेनवर नियंत्रण ठेवले होते. २ डिसेंबर १९९३ रोजी कोलंबिया पोलिसांनी पाब्लो एस्कोबारची हत्या केली.

पण मृत्यू होण्यापूर्वी त्याने पोलिस व सैनिकांवर जोरदार दबाव आणला होता. पाब्लोने कोलंबियामध्ये भयानक दहशत निर्माण केली. कार उडविणे किंवा एखाद्या मोठ्या नेत्याला ठार करणे ही त्याच्यासाठी छोटी गोष्ट होती.

कोलंबियाचा राष्ट्रपती बनण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याच्यावर एक वेब सिरीजही बनवण्यात आली आहे जी नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! राज्यातील लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवणार; आरोग्यमंत्र्यांची घोषणा
अरे हाड..आम्ही प्रश्न विचारणार, सत्तेतल्या प्रत्येकाला; मराठमोळा अभिनेता राजकारण्यांवर संतापला
मोठी बातमी! १ मे पासून होणारे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण रद्द, आरोग्यमंत्र्यांची माहिती
करिअरमध्ये अक्षय,अजयपेक्षा मागे का राहिले सुनील शेट्टी; स्वतःच सांगितले ‘ते’ कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.