जाणून घ्या ७० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्री मौसमी चॅटर्जीची कहानी

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री देखील खुप महत्वाच्या आहेत. त्यांच्याशिवाय कोणताही चित्रपट पुर्ण होत नाही. पण बॉलीवूडमध्ये असे बोलले जाते की, अभिनेत्रींच्या लग्नानंतर त्यांचे करिअर बंद पडते. अगोदरच्या काळात तर लग्नानंतर अभिनेत्रींना चित्रपटांमध्ये घेतले जात नव्हते.

पण बॉलीवूडमध्ये अशा एक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नानंतर त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. विवाहीत असून देखील त्या ७० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्री बनल्या होत्या. या अभिनेत्रीचे नाव होते मॉसमी चॅटर्जी. खुप कमी लोकांना माहीती आहे मौसमीने इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता त्यावेळी त्या विवाहीत होत्या. तरीसुद्धा त्या इँडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्री बनल्या.

७० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री मौसमी चॅटर्जी ७७ वर्षांच्या झाल्या आहेत. ७० आणि ८० च्या दशकामध्ये मॉसमी खुप प्रसिद्ध होत्या. त्यांनी हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुंदरतेच्या जोरावर त्यांनी अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये राज्य केले होते.

२६ एप्रिल १९६८ ला मौसमीचा जन्म कोलकात्तामध्ये झाला होता. त्यांचे वडील आर्मी ऑफिसवर होते. शाळेच्या दिवसांपासूनच त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. त्यांचे खरे नाव इंदिरा चॅटर्जी आहे. पण बंगाली सिनेमाचे दिग्दर्शक तरुण मजूमदारने त्यांचे नाव बदलून मौसमी चॅटर्जी ठेवले होते.

सोळा वर्षांच्या मौसमी चॅटर्जीने बांगला चित्रपट ‘बालिका वधू’मधून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘अनूराग’ चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्याअगोदर खुप कमी वयात त्यांनी जयंत कुमारसोबत लग्न केले होते.

बॉलीवूडसाठी बोलले जाते की, इथे लग्नानंतर अभिनेत्रींचे करिअर संपते. पण मौसमीबद्दल सगळे उलटे झाले. विवाहीत असून देखील मौसमी बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सामील झाल्या. त्यांचा अभिनय आणि सुंदरता प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला त्यामूळे लोकांच्या विवाहीत असण्याने काहीह फरक पडला नाही.

१८ व्या वर्षी मौसमी चॅटर्जी आई झाल्या. एका मुलीला जन्म दिल्यानंतर देखील अभिनय क्षेत्र सोडले नाही. त्या बॉलीवूडमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम करत होत्या. मौसमी गरोदर होत्या त्यावेळी त्या ‘रोटी कपडा और मकान’ चित्रपटात काम करत होत्या. पण त्यांचा अभिनय पाहून लोकांना कळालेच नाही की, त्या गरोदर आहेत.

याच चित्रपटाचा एक किस्सा मौसमीने सांगितला होता. त्यांनी सांगितले की, ‘या चित्रपटाची शुटींग सुरु असताना मी पायऱ्यांवरुन पडले होते. त्यामूळे मला खुप त्रास होत होता. मला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि देवाच्या कृपेने माझे बाळ नीट होते. त्यानंतर मी अनेक दिवस शुटींग केले नाही. पण बाळाच्या जन्मानंतर मी परत कामाला लागले’.

बाळाच्या जन्मानंतर देखील मौसमीने बॉलीवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले. त्यांनी अमिताभ बच्चन, संजीव कुमार, विनोद खन्ना, मिथून चक्रवर्तीसारख्या अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले. मौसमी चॅटर्जी त्याकाळी बॉलीवूडच्या एकमेव अशा अभिनेत्री होत्या ज्या लग्नानंतर देखील यशस्वीपणे काम करत होत्या.

महत्वाच्या बातम्या –
जाणून घ्या आज काय करते ‘शोले’ चित्रपटातील सांभाचे कुटूंब ?
‘सुर्यवंशम’ चित्रपटातील अभिनेत्रीचा शेवट होता अत्यंत वाईट; गरोदर असताना झाला मृत्यू
करिअरमध्ये अक्षय,अजयपेक्षा मागे का राहिले सुनील शेट्टी; स्वतःच सांगितले ‘ते’ कारण
‘या’ हॉलीवूड अभिनेत्याने केले होते शिल्पा शेट्टीला सगळ्यांसमोर जबरदस्ती किस; प्रकरण गेले कोर्टात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.