Share

Ganpati : गणपती बाप्पाला मोदकच का आवडतात? बाप्पा आणि मोदकाचं नातं काय? जाणून घ्या..

Modak

Ganpati : गणपती बाप्पा म्हटलं की, मोदक आठवतातच. मोदकांशिवाय बाप्पा अपूर्ण आहेत असे म्हटले तरी हरकत नाही. म्हणूनच बाप्पांच्या हातात कधीही मोदक पाहायला मिळतो. गणेशोत्सवात बहुतेक ठिकाणी मोदकाचाच प्रसाद खायला मिळतो. परंतु, मोदकाला एवढे महत्व का आहे? बाप्पाला मोदक इतके का आवडतात?, हे तुम्हाला माहिती आहे का? या प्रश्नाचे उत्तर वाचा या लेखात.

गणपती बाप्पांची अनेक नावे आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे एकदंत. गणपती बाप्पांना एकच दात असल्यामुळे त्यांचे नाव एकदंत असे पडले. बाप्पांना अनेक गोड पदार्थ आवडतात. त्यातीलच एक म्हणजे मोदक. बाप्पांना एकच दात असल्यामुळे काहीही खायला त्रास व्हायचा.

त्यामुळे त्यांच्याकरीता मऊसूत मोदक तयार केले गेले व तेव्हापासूनच बाप्पांना मोदक प्रिय झाले. मोदक हे अनेक प्रकारे तयार केले जातात. तळलेले मोदक, उकडीचे मोदक, काजूचे मोदक, कणकेचे मोदक, उपवासाचे मोदक अशा अनेक प्रकारे मोदक तयार करता येतात.

त्यापैकी उकडीच्या मोदकांना विशेष महत्व आहे. उकडीचे मोदक हे तांदळाची उकड, गुळ व खोबरे यापासून तयार केले जातात. मोदक बनविणे हीसुद्धा एक कला आहे. मोदकाचा विशिष्ट आकार हा त्याला विशेष महत्व प्राप्त करून देतो. तसेच मोदक अनेक पदार्थांपासून तयार केले जातात.

एका कथेनुसार, देवतांनी अमृतापासून तयार करण्यात आलेला मोदक पार्वतीला दिला. पार्वती देवीने बाप्पांना मोदकाबद्दल सांगितल्यानंतर त्यांना तो खाण्याची ईच्छा झाली. त्यानंतर पार्वतीदेवीने त्यांना मोदक दिले. ते मोदक बाप्पांना आवडले व त्यांना खूप आनंद झाला. तेव्हापासून बाप्पांना मोदक प्रिय आहेत.

महाराष्ट्रात गणेश उत्सवाला विशेष महत्व आहे. सगळीकडे १० दिवसांचा हा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. गेली दोन वर्षे कोरोनामुळे सगळीकडे निर्बंध लावण्यात आले होते. परंतु, यावर्षी सर्व उत्सव उत्साहात साजरे करण्यासाठी राज्यसशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव थाटात साजरा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray : जळगावात शिवसैनिकांमध्ये तुफान राडा; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशामुळे शिवसैनिक नाराज
आणखी एका राज्यातील विरोधी पक्षाचे सरकार पाडण्याची भाजपची खेळी; ४० आमदार रिसाॅर्टवर दाखल
गद्दार संतोष बांगर आणि हेमंत पाटलांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी खेळला मोठा डाव
महाविकास आघाडीचं काय होणार? खुद्द शरद पवारांनी सांगितली अंतर्गत बाब, ‘असा’ आहे प्लॅन, शिंदे सरकारच्या पोटात गोळा

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now