जर तुम्ही पेन्शन धारक असाल तर लवकरात लवकर हे डॉक्युमेंट करा सबमिट, नाही तर पेन्शन होईल बंद!

 

मुंबई | देशातभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे जेष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तसेच काही ठिकाणी जेष्ठ नागरिकांच्या प्रवासावरही बंदी आहे. त्यामुळे सरकारने वर्ष २०२० चे लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची अंतिम तारीख तारीख वाढवली आहे.

आता यावर्षी पेन्शनधारक त्यांचे लाईफ सर्टिफिकेट तारीख १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २० पर्यंत सादर करू शकणार आहे. मात्र नोव्हेंबर पर्यंत हे सादर न केल्यास पेन्शनधारकांची पेन्शन रोखली जाऊ शकते.

लाईफ सर्टिफिकेट हे पेन्शन धारकाच्या अस्तित्वाचा पुरावा असते. जर हे लाईफ सर्टिफिकेट पेन्शन धारकांनी जमा केले नाही तर त्यांची पेन्शन बंद होऊ शकते.

प्रत्येक निवृत्तीधारक, कुटुंब निवृत्तीधारकांना, दरवर्षी त्यांचे निवृत्तिवेतन सुरू ठेवण्यासाठी आपले लाईफ सर्टिफिकेट ३० नोव्हेंबरपर्यंत बँकेत जमा करावे लागते.

तसेच ज्या निवृत्तीधारकांचे लाईफ सर्टिफिकेट नोव्हेंबर अखेरपर्यंत पोहचले नाहीत त्यांचे पेन्शन रोखले गेले आहे. निवृत्तीवेतनधारकाने लाईफ सर्टिफिकेट जमा केल्यानंतरच पेन्शन भरपाई सुरू केली जाते.

पेन्शनधारक आपले लाईफ सर्टिफिकेट निवृत्तीवेतनाच्या बँकेच्या शाखेत किंवा कुठलाही बँकेच्या शाखेत जमा करू शकतात. त्यात तुम्ही ते फिसीकली किंवा ऑनलाईन देखील जमा करू शकतात.

आपण आपल्याकडे असणाऱ्या मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारेही हे सर्टिफिकेट जमा करू शकतो. त्यासाठी तुम्ही https://jeevanpramaan.gov.in वर जाऊन तुम्ही लाईफ सर्टिफिकेट डिजिटली सबमिट करू शकतात.

पेन्शनधारकाला लाईफ सर्टिफिकेट डिजिटली सादर करण्यासाठी आधार नंबर, मोबाईल नंबर, पेन्शन पेमेंट ऑर्डर नंबर आणि अकाउंट नंबर देणे गरजेचे असणार आहे. तसेच हे सर्टिफिकेट प्रत्यक्ष सबमिट करायचे असेल तर तुम्ही बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन ते डाऊनलोड करून सबमिट करू शकतात.

तुम्ही Umang ऍपद्वारे तुमचे लाईफ सर्टिफिकेट तयार करू शकतात. त्यासाठी तुम्हाला हे ऍप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावा लागेल, त्यानंतर ऍपमध्ये जीवन प्रमाण सर्च करावे. तिथे क्लिक केल्यावर पेन्शन ऑथ्यांटीकेशन पेज उघडेल. तिथे आवश्यक ती माहिती भरून डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार करू शकतात.

महत्वाच्या बातम्या-

वाढीव लाईटबिलामुळे त्रस्त आहात? या गोष्टी करा परत वाढीव लाईटबिल येणार नाही

राज्याचे हक्काचे पैसे केंद्र सरकारने लवकरात लवकर द्यावे; जयंत पाटलांची मागणी

हे काय नविनच! अमरावतीत पवार नॉनव्हेज आणि फडणवीस व्हेज थाळी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.