शेतीच्या वादातून दोन शेतकऱ्यांमध्ये तुफान हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

औरंगाबाद। फुलंब्री तालुक्यातील पाल गावात शेतीच्या वादातून दोन शेतकऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. व या घटनेत एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याचे समोर आले. या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दोन शेतकरी व सोबतच त्यांच्या नातेवाईकांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

या हाणामारीत एक शेतकरी जखमी झाला. जगदीशकुमार कुंटे असं मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. फुलंब्री पोलिसांनी अजूनही घटनेची दखल घेतली नसल्याची माहिती आहे. नक्की कारण काय हे समोर आलेलं नाही. मात्र याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, वाद एवढा वाढला की हे दोन शेतकरी एकमेकांच्या पोटावर बसून एकमेकांना मारत आहेत. व बाजूला असलेल्या महिला व छोटा मुलगा भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्यांचे नातेवाईक भांडण करत आहे. हा व्हिडीओ अनिस बेंद्रे या ट्विटर अकाऊंट वरून व्हायरल झाला आहे.

या आधीही नागद गावातून अशीच एक घटना समोर आली होती. यामध्ये दोन गटातील लोक एकमेकांना चांगलेच मारहाण करत असल्याचे दिसत होते. हे लोक लाठ्या-काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत असल्याचे पाहायला मिळाले.

महत्वाच्या बातम्या 

पतीचा मोबाईल बंद असल्याने बायको गेली शोधायला, पण पुढे जे झालं ते पाहून बायको हादरली

खळबळजनक! बँकेत मास्क न घातल्यामुळे सुरक्षारक्षकाने ग्राहकाला घातली गोळी

शेतकऱ्याने शोधली कांदा साठवण्याचा एक अनोखी पद्धत; दोन वर्ष एकही कांदा होणार नाही खराब

सुनीताची शेती पद्धती काही निराळीच! घराच्या अंगणात शेती करून कमावते लाखो रूपये; जाणून घ्या..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.