“अयोध्येत येण्यापासून उद्धव ठाकरेंना कोणीही रोखू शकणार नाही”

अयोध्या । शिवसेना आणि कंगना रणावत यांच्यात सध्या जोरदार वाद सुरू आहे. मुंबईबद्दल केलेले वक्तव्य कंगनाच्या चांगलेच अंगलट आले आहे. पालिकेने तिचे मुंबई मधील ऑफिस देखील पाडले आहे.

यातच उद्धव ठाकरे आणि कंगणा राणावत यांच्यातील वाद पेटला होता त्यावेळी उद्धव ठाकरेंनी अयोध्येते येऊ नये, असे अयोध्येतील संतांनी म्हटले होते. मात्र श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय हे ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
त्यांनी ठाकरे यांना पाठिंबा देत मोठे वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले, कुणाच्या आईने त्याला इतके दूध पाजलंय की तो उद्धव ठाकरेंचा सामना करेल आणि ते देखील अयोध्येत, कुणाच्या आईने इतके जिरे खावून इतक्या शक्तीशाली मुलाला जन्म दिलाय की तो गंगेला रोखू शकेल, असे म्हणत चंपत राय यांनी ठाकरेंना अयोध्यत येण्यासाठी विरोध करणाऱ्यांना आव्हान दिले आहे.

अयोध्येत असे कोण आहे, ज्याच्या आईने इतके जिरे खाल्याने अशा संतानाने जन्म घेतला आहे की तो अयोध्येत उद्धव ठाकरेंना येण्यापासून रोखू शकेल, असेही चंपत राय यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंना त्यांनी पाठिंबा देत असे वक्तव्य करणारांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.

कंगणा राणावतचे कार्यालयावर मुंबई महापालिकेने हातोडा मारण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत येऊ नये अशी घोषणा केली होती. यावरून शिवसेनेकडून देखील जोरदार टीका करण्यात आली होती.

जर उद्धव ठाकरे आलेच तर त्यांचे स्वागत होणार नाहीच पण त्यांना विरोधाला तोंड द्यावे लागेल, असे म्हणत विश्व हिंदू परिषदेने ठाकरेंना इशारा दिला होता. राम मंदिर भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे गेले नव्हते. मात्र लवकरच अयोध्येत जाणार असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.