कोरोनाच्या लसीची स्पर्धा थांबवा नाहीतर..; जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली भीती

 

जिनिव्हा |  कोरोनाच्या संकटाने जगभरात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे, यामुळे सध्या कोरोनावरील लस शोधण्याचे काम अनेक देश करत आहे.

कोरोना लसीच्या शोधात अनेक देशांमध्ये आता स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने भीती व्यक्त केली आहे.

कोरोना लस बनवण्यासाठी अनेक देशांमध्ये सुरु असणाऱ्या स्पर्धा थांबवायला हव्या नाहीतर कोरोना साथीचा धोका आणखी वाढण्याची शकतो, अशी भीती WHOचे प्रमुख टेड्रॉस ऍडनम यांनी व्यक्त केली आहे.

तसेच अनेक देशांमध्ये कोरोना लस बनवण्याची जी स्पर्धा सुरु आहे, त्याऐवजी सर्व देशांनी एकत्र येऊन कोरोना संपवण्यासाठी काम करावे, असे आवाहन टेड्रॉस यांनी केले आहे.

दरम्यान, तरुणांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. यावर WHO ने चिंता व्यक्त केली आहे. तसेच तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजत नसल्याने त्यांच्या माध्यमातून वयोवृद्धांनाही संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे, असे WHO ने म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.