कांदा बियाण्याचा तुटवडा, निर्यात ताबडतोब थांबवा; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

नाशिक |  कंपन्यांना राज्याबाहेर कांदा बियाणे विक्रिसाठी संपूर्ण बंद निर्यात बंद करावी. कांदा कंपन्यांनी बियाणे चढ्या दराने उपलब्ध करुन द्यावे. त्यासाठी कृषी विभागाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनी केली आहे.

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे, खराब हवामानामुळे खरीप व रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या कांदा बियाण्याचा उतारा मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादकांना लाल आणि उन्हाळ कांद्याच्या बियाण्याचा तुडवडा भासत आहे.

राज्यात उत्पादित झालेले खासगी कंपन्यांचे बियाणे प्राधान्यक्रमाने राज्यातील शेतकऱ्यांना विकले जावे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनिल वानखेडे यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे आणि प्रवक्ते शैलेंद्र पाटील यांनी याबाबत पत्र दिले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.