शेअर बाजार कोसळला, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेनेक्स आणि निफ्टी एवढ्या अंकांनी घसरले

आठवड्याच्या पहिल्याचं दिवशी, सोमवारी सकाळी शेअर बाजार घसरणीसह उघडला आणि शेवटच्या व्यवहाराच्या तासातही ही घसरण कायम राहिली. दुपारी 3:00 वाजता राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच ‘निफ्टी’ 391.85 अंकांनी घसरून 17,372.95 वर व्यवहार करत होता, तर ‘सेन्सेक्स’ 1284.93 च्या घसरणीसह 58,351 वर व्यवहार करत होता.

सेन्सेक्स 58,514.32 वर व्यवहार करत असताना, दुपारी 12:15 वाजता 1121.69 अंकांपेक्षा अधिक घसरला. काल सेन्सेक्समध्ये ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’च्या शेअरमध्ये सर्वात जास्त म्हणजे 3.34% घसरण दिसली. त्याचवेळी बजाज फायनान्स, एलटी, टायटन, एचडीएफसी, डॉ रेड्डी यांच्या शेअर्समध्येही घसरण झाली.

तर दुसरीकडे, भारती एअरटेल हिरव्या चिन्हाच्या वर व्यवहार करत होता. याशिवाय इंडसंइड बँक, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर यांनीही सकारात्मक सुरुवात केली. दुपारी 12.12 वाजता सेन्सेक्स 1061.68 अंकांनी घसरून 58,574.33 अंकांवर व्यवहार करत होता, तर एनएसईचा निफ्टीही 312.40 अंकांनी घसरून 17,452.40 अंकांवर व्यवहार करत होता.

भारती एअरटेल, एशियन पेंट्स, पॉवरग्रिड आणि टीसीएस व्यतिरिक्त सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेले इतर सर्व शेअर्स घसरणीसह व्यवहार करताना दिसले. रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चे शेअर 4.24 टक्क्यांनी घसरून 2368 रुपयांवर व्यवहार करत होते.

बीएसईचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 251.51 अंकांनी घसरून 59,384.50 वर पोहोचला, तर सोमवारी सेन्सेक्ससह निफ्टीमध्येही घसरण झाली. गेल्या आठवड्यात बीएसईचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 59,968 अंकांच्या घसरणीसह उघडला.

सोमवारी सकाळी शेअर बाजारात घसरण झाली, मुंबई शेअर बाजारातील बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 5.49 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर रिलायन्सचे शेअर 4.17 टक्क्यांनी घसरले. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच निफ्टी 319.25 अंकांनी घसरून 17,445.55 अंकांवर व्यवहार करत होता.

रिसर्च, रेलिगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष ‘अजित मिश्रा’ यांच्या मते, “25 नोव्हेंबरला महिन्यातील डेरिव्हेटिव्ह्ज कॉन्ट्रॅक्ट्सच्या सेटलमेंटमुळे आठवडाभर बाजार अस्थिर राहू शकतो. तसेच, देशांतर्गत कोणत्याही मोठ्या घडामोडी नसल्यामुळे, गुंतवणूकदार प्रामुख्याने निर्देशकांसाठी जागतिक बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करतील.”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.