Homeखेळस्टिव्ह स्मिथ अडकला हॉटेलच्या लिफ्टमध्ये, १ तास अडकल्यामुळे ‘अशी’ झाली अवस्था; पहा...

स्टिव्ह स्मिथ अडकला हॉटेलच्या लिफ्टमध्ये, १ तास अडकल्यामुळे ‘अशी’ झाली अवस्था; पहा व्हिडिओ

ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या ऍशेस कसोटी सामन्याची तयारी सुरू केली आहे. बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या संघाने डावाच्या फरकाने विजय मिळवत ३-० अशी आघाडी घेतली. आता चौथा कसोटी सामना ५ जानेवारीपासून सिडनीत खेळवला जाणार आहे.

अशात ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ चौथ्या कसोटी सामन्यावरही विशेष लक्ष देत आहे, जो आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतण्यासाठी आतुर असणार आहे. दरम्यान, स्मिथसोबत एक हैराण करणारी घटना घडली. स्मिथ हॉटेलच्या २० व्या मजल्यावर सुमारे ५५ मिनिटे लिफ्टमध्ये अडकला होता. स्मिथने लिफ्टच्या आतून या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये स्मिथ म्हणाला, मी संध्याकाळचे ज्या पद्धतीने नियोजन केले होते. तसे काहीच झाले नाही. मी सध्या लिफ्टमध्ये अडकलो आहे. तसेच इथले दरवाजेही उघडत नाहीत. मी दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य होत नाही. मी आतून उघडत होतो, तर मार्नस लॅबुशेन दुसऱ्या बाजूने प्रयत्न करत होता.

स्टीव्ह स्मिथने सांगितले की, जेव्हा त्याच्याकडे करण्यासारखे काहीच नव्हते तेव्हा तो लिफ्टमध्ये बसला. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार स्मिथने त्याच्या चाहत्यांना विचारले की, जर एखादी व्यक्ती लिफ्टमध्ये अडकली तर तो आतून काय प्रयत्न करु शकतो.

अखेर एक मेकॅनिक स्मिथच्या मदतीला धावून आला. त्यानंतर स्मिथला बाहेर काढण्यासाठी दरवाजे उघडले. स्टिव्ह स्मिथ सुरक्षितपणे बाहेर पडल्यानंतर, स्मिथ हसला आणि म्हणाला, ही ती ५५ मिनिटे आहेत जी मी कधीच विसरु शकणार नाही.

स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत ८० कसोटी सामन्यांमध्ये ६०.८४ च्या सरासरीने ७६६७ धावा केल्या आहेत. तसेच आतापर्यंत त्याने २७ शतके आणि ३२ अर्धशतके झळकावली आहेत. स्मिथने अॅशेस २०२०-२१ मध्ये ३ कसोटी सामन्यांच्या ४ डावात १२७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने अॅडलेडमध्ये ९३ धावांची शानदार कर्णधार खेळी खेळली. पण उर्वरित तीन सामन्यात तो दमदार कामगिरी करु शकला नाही.

महत्वाच्या बातम्या-
…तर उमेदवारांना MPSC च्या परीक्षेला बसता येणार नाही; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय
मोदींशी सुसंवाद साधण्यासाठी कोणीही तयार नव्हते, तेव्हा मी…; शरद पवारांनी सांगितला ‘तो’ हैराण करणारा किस्सा
आपल्याच सावत्र बापाच्या प्रेमात पडली मुलगी, नंतर असा काढला जन्मदात्या आईचा काटा