ऐश्वर्यापासून लांब रहा, गाठ आमच्याशी आहे! ‘या’ व्यक्तींनी संजय दत्तला दिली होती धमकी

बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री येतात आणि जातात. पण काही अभिनेत्रींची जागा मात्र कोणीच घेऊ शकत नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय.

ऐश्वर्या रायचे सौंदर्य, डान्स, तिचा अभिनय कोणालाही सहज भुरळ घालू शकेल असा आहे. आत्ताच नाही तर अभिनय क्षेत्रात येण्याअगोदरपासूनच तिचे अनेक फॅन्स आहेत.

तिचा असाच एक खुप मोठा फॅन म्हणजे संजय दत्त. ऐश्वर्या अभिनेत्री बनण्याअगोदर पासूनच तो तिचा चाहता आहे. कारण या दोघांनी एकत्र फोटोशूटमध्ये काम केले आहे.

अभिनेत्री होण्याअगोदर ऐश्वर्या राय मॉडेलिंग करत होती. १९९३ साली तिला संजय दत्तसोबत एका मासिकासाठी साइन करण्यात आले होते.

दिल फेक संजय दत्त ऐश्वर्या रायला पाहताच क्षणी तिचा दिवाना झाला. तो तिला पटवण्यासाठी प्रयत्न करू लागला. ही गोष्ट जेव्हा संजय दत्तच्या बहिणींना समजली. तेव्हा त्या चिडल्या.

कारण संजय दत्त सुरूवतीपासूनच फिल्मी करिअरपेक्षा इतर गोष्टींमुळेच जास्त चर्चेत असायचा. त्याचे अनेक अभिनेत्रींसह असलेल्या अफेअरच्या नेहमीच चर्चा असायच्या. सुंदर चेहरा दिसला नाही की, संजय दत्त लगेच पाठी गेला असेच समजले जायचे.

ऐश्वर्या रायबरोबर संजय दत्तने असे काही करू नये ज्यामुळे ती दुखावली जाईल. म्हणून बहिण नम्रता आणि प्रियाने त्याला तिच्यापासून लांबच राहण्याची ताकीदच दिली होती. नम्रता आणि प्रियाला ऐश्वर्या प्रचंड आवडायची.

त्यामुळे तिला पटवण्याचा जराही प्रयत्न केला. तर गाठ आमच्याशी आहे. तू तिला तिचा फोन नंबर मागणार नाही. तिला पटवण्यासाठी कोणतेही महागडे गिफ्टही देणार नाहीस असेही सांगण्यात आले होते.

त्यावेळी संजय दत्तने दोन्ही बहिणींना वचन दिले की तो तसे काही करणार नाही. तो फक्त काम करेल आणि ऐश्वर्याला चांगली मैत्रीण बनवेल.

त्यावेळी संजय दत्तला ऐश्वर्या जर अभिनयक्षेत्रात आली तर तिचे सौंदर्य, तिच्यातील नचाकत सगळीच ती हरवून बसेल. त्यामुळे तिने झगमगाटापासून दूर राहावे असे वाटायचे.

संजय दत्त आणि ऐश्वर्या राय यांनी ‘शब्द’ आणि ‘हम किस से नहीं’ अशा सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यावेळी बहिणींना दिलेला शब्दही संजय दत्तने पाळला आणि ऐश्वर्यासोबत चांगली मैत्री केली. आजही दोघांमध्ये खूप चांगली मैत्रीचे संबंध असल्याचे बोलले जाते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.