भाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान, मांस मच्छी, मटणापेक्षा बीफ जास्त खावा

बीफ अर्थात गोमांस हा भारतात अत्यंत संवेदनशील विषय आहे. हा नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे. तसंच या विषयावरून देशात अनेक प्रकारचं राजकारण, हिंसा, वादविवाद आदी गोष्टीही घडलेल्या आहेत. गोमांस बाळगल्याच्या नुसत्या संशयावरूनही अनेक वादग्रस्त घटना घडल्या आहेत.

याच मुद्द्यावर मेघालयातील भाजप सरकारच्या मंत्र्याने वादग्रस्त विधान केले आहे. मंत्री सानबोर शुलाई यांनी चिकन किंवा शेळीपेक्षा जास्त गोमांस खाण्याचा सल्ला दिला आहे. भाजप सरकारमधील कॅबिनेट मंत्री शुलाई म्हणाले की, लोकशाही देशात प्रत्येकाला हवे असलेले अन्न खाण्यास मोकळे आहे.

मेघालयचे मंत्री सनबोर शुलाई यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वादाला सुरुवात होणार आहे. त्यांनी राज्यातील लोकांना कोंबडी, मेंढी किंवा बकरीचे मांस किंवा मासे यापेक्षा जास्त गोमांस खाण्यास सांगितले, आणि त्यांचा पक्ष याच्या विरोधात असल्याचे देखील नाकारले आहे.

गेल्या आठवड्यात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणारे भाजपचे ज्येष्ठ नेते शुलाई म्हणाले की, भारत हा लोकशाही देश आहे. त्यामुळे देशाच्या प्रत्येक नागरिकाला स्वतःला जे आवडेल ते खाण्याचं स्वातंत्र्य आहे.

चिकन, मटण, मांस आदींच्या तुलनेत आपण लोकांना बीफ अधिक प्रमाणात खाण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत, असे सनबोर शुलई यांनी सांगितले. भाजप गोहत्येवर निर्बंध आणेल, अशी लोकांची धारणा असून, लोकांना बीफ खाण्यासाठी प्रोत्साहित केल्यानंतर ती दूर होईल, असे शुलई यांनी सांगितले आहे.

शुलई यांच्या या वक्तव्याला पार्श्वभूमी आहे ती आसाममध्ये आलेल्या एका कायद्याची. आसामने नुकताच गो संरक्षण कायदा आणला असून, त्यानुसार शेजारच्या बांगलादेशमध्ये होणारी गायींची तस्करी रोखण्यासाठी आसाममधून गायींच्या आंतरराष्ट्रीय निर्यातीवर निर्बंध येणार आहेत.

या कायद्याचा परिणाम कोणत्याही प्रकारे मेघालयवर होऊ नये, यासाठी आपण आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांच्याशी संवाद साधणार आहोत, असंही शुलई यांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडणार आहे.

ताज्या बातम्या

..आणि नवरीला मंडपातच मारू लागला तिचा भाऊ, मग नवरदेवाने केली मेहुण्याची धूलाई, पहा व्हिडिओ

कारगिल युद्धाला जाण्याच्या आधी शहिद विक्रम बत्रा यांनी प्रियसीचा भरला होता रक्ताने भांग; वाचा संपूर्ण प्रेमकहाणी

मोदी म्हणतात, ‘मी चहावाला’; मात्र ‘ते चहावाले नाहीत’ म्हणत भाऊ प्रल्हाद मोदींचा मोठा गौप्यस्फोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.