राज्य लस खरेदी करणार, मग मोदींचा फोटो का छापायचा? राज्यांनी मोदींचा फोटो हटवला

नवी दिल्ली । देशात सगळीकडे कोरोना लसीकरण सुरू झाले असले तरी लसीकरणाला हवा तसा वेग येत नाही. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी मोठ्या रांगा लावल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसभर रांगेत उभा राहून देखील लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तसेच केंद्र सरकारने लस पुरवठ्याबाबत केलेल्या अन्यायामुळे केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.
यातच लसीकरणावरून राजकारण देखील बघायला मिळत आहे. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर कोणाचा फोटो छापायचा यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे.

कोरोना लसीकरणानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आता वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. काँग्रेसने याला जोरदार विरोध केला आहे. यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.

काँग्रेसची सत्ता असणाऱ्या छत्तीसगड आणि झारखंडमधील सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येणारे मोदींचा फोटो असणारे लसीकरण प्रमाणपत्र देणार नसल्याचे स्पष्ट केले. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी हे नवीन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

यामुळे आता केंद्र आणि राज्य असा वाद पेटला आहे. छत्तीसगडमध्ये लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी पोर्टल सुरु करण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंग देव यांनी राज्यातील कोरोना लसीकरण प्रमाणपत्रांवर मुख्यमंत्रांचा फोटो छापला जाणार असल्याची माहिती दिली.

ते म्हणाले, आम्ही आमच्या लसी विकत घेऊन लोकांचे लसीकरण करणार आहोत. असे असताना आम्ही आमची प्रमाणपत्र का छापू नये? आम्ही विकत घेऊन दिलेल्या लसींच्या प्रमाणपत्रांवर मोदींचा फोटो कशाला छापायचा? असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

त्यांनी माझ्या आईला सोडणे योग्य नव्हतेच, पण..; वडिल्यांच्या दुसऱ्या लग्नावर अर्जुन पहिल्यांदाच बोलला

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नववधू १५ तोळं सोनं घेऊन पळाली, दुसऱ्यासोबत लग्न करताना घावली, आणि..

सैराटमधील प्रदीप आठवतोय? सध्या काय करतोय बघून आश्चर्यचकीत व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.