राज्याच्या पोलीस दलात प्रचंड खळबळ! खुनाच्या गुन्ह्यात पोलीस निरीक्षकांसह ३ जणांना अटक; एक फरार

गोंदिया । राज्यात पोलीस दलात दिवसेंदिवस धक्कादायक घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच १०० कोटींच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. पोलीस बदली, पोलीस मारहाण या घटना ताज्या असताना आता अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गोंदियामधून एक धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे. पोलीस कोठडीत आरोपी मृत्यू प्रकरणी पोलीस निरीक्षकांसह ३ पोलिसांना भादवी कलम ३०२ खाली अटक करण्यात आली आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
एक पोलीस उपनिरीक्षक अटकेच्या भीतीने फरार आहे.

त्यामुळे पोलीस विभागात उडाली खळबळ उडाली आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची मागणी केली जात आहे. यामुळे हे प्रकरण आहे राज्यभरात चांगलेच गाजले आहे. पोलिसांवरच आता यामुळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कुंभारटोली येथे गुन्ह्याप्रकरणी राजकुमार अभयकुमार धोती याला अटक करण्यात आली होती. कोठडीत पोलिसांनी राजकुमारला बेदम मारहाण केली होती. त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे सीआयडीत तपासात सिद्ध झाले होते.

यामुळे या पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक सह पाच पोलीसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाचवेळी पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

त्यांना ३०२ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र उपनिरीक्षक महावीर जाधव फरार आहे. यामध्ये आरोपी  पोलीस निरीक्षक सुभाष चौहान , सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव,पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे, अरुण उके, दत्तातय कांबळे यांना अटक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

नव्या नवरीने अर्ध्या रात्री प्रियकरला बोलावले अन् सासरहून १५ लाख रुपये घेऊन झाली फरार

‘मेरे सैंया सुपरस्टार’ गाण्यावर डान्स केलेल्या त्या नवरीला टक्कर द्यायला आली आजून एक मुलगी; पहा दोघींचा डान्स

सचिनची मुलगा सारा तेंडूलकरसोबतच्या नात्यावर क्रिकेटपटू शुभमन गिलने सोडले मौन; स्पष्ट शब्दांच केला नात्याचा…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.