राज्य सरकार पुण्यात मिशन झिरो राबवणार; जाणून घ्या नेमकं काय आहे मिशन झिरो..

 

मुंबई | राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. मात्र आता राज्य सरकारने  राज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ची सुरुवात केली आहे.

मुंबईत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी पुण्यातही मिशन झिरो ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

पुण्यातही मिशन झिरो ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या ठिकाणी ऍक्टिव्ह रुग्ण संख्या कमी करणे, बेडची संख्या वाढवणे, आयसोलेशन करणे, कोरोना टेस्ट करणे यासर्व गोष्टी अमलात जात असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

सिंगल पॉईंट काँटॅक्ट ही प्रणाली तयार केली जाणार आहे. ही संकल्पना नाशिक, पुणे एम एम आर रिजनमध्ये राबवली जाणार आहे.

जेणेकरून एका ठिकाणी सर्व माहिती गोळा होईल, त्यामुळे कोरोना संख्येत अटकाव आणण्यास मदत होईल, असे राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.