राज्य सरकारचा मोठा निर्णय! आजपासून नवा सातबारा, जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही

पुणे । आजपासून महाराष्ट्रातील नागरिकांना नव्या फॉरमॅटमध्ये ऑनलाईन सात बारा मिळणार आहे. यामुळे आता तलाठ्यांचा वेळ वाचले आणि कुणालाही जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही. यामुळे हा एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसुली सेवांबाबत मोठी घोषणा केली.

थोरात यांनी यावेळी महसूल दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आता सहजता, पारदर्शकता आणि बिनचूक सेवा सुरू होईल. सर्व सेवा ऑनलाईन असेल. सात बारा ऑनलाईन केला आहे.यामुळे आता होणारा त्रास कमी होणार आहे.

मिळकत पत्रिका सुद्धा पूर्ण होत आली आहे. ई म्युटेशन सुद्धा पूर्ण होत आलेय, लवकरच मिळेल. फेरफार सुद्धा डिजीटल रुपात मिळतील. यामुळे तलाठ्याचा वेळ वाचणार आहे. तसेच खोट्या नोंदी करता येणार नाही. फोटो आणि लोकेशन मिळेल. असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

यामध्ये गैरप्रकार होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. स्टॅम्प ड्युटीत ६ महिने सवलत देण्यात आली. या काळात अनेक कागदपत्रे रजिस्टर झाली. याची नागरिकांना मोठी मदत झाली. बिल्डर, डेव्हलपर्स यांनाही मदत झाली. असेही ते म्हणाले.

ई पीक पाहणी सुद्धा सुरू आहे. स्वतःच शेतकरी नोंद करू शकणार आहेत. त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री करणार आहेत. काही तालुक्यांमध्ये याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. टाटा ट्रस्टची मदत मिळत आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

यामुळे पिकांची लागवड कळणार आहे. विमा कवच, अनुदान आणि कर्जाची माहिती देखील मिळणार आहे. यामुळे सर्व कामे सुखकर केली जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

१० वीत असताना बलात्कार करुन गर्भवती केलं; आरोपीला शिक्षा मिळाल्यानंतर तरुणीला करायचंय त्याच्याशीच लग्न

बलात्कार करणाऱ्या आरोपीशीच लग्न करायला निघाली तरुणी; आरोपीला मिळाली होती २० वर्षांची शिक्षा

पत्नीच्या मृत्यूनंतर हा बाप बाळाला कडेवर घेऊन शिकवतोय, जाणून घ्या ह्दयस्पर्शी कहाणी…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.