ठाकरे सरकारला केंद्राचा ठेंगा; शिफारस केलेल्या ९८ पैकी ‘या’ एकमेव व्यक्तीला पद्म पुरस्कार

मुंबई | केंद्र सरकारने देशातील ११९ कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे ९८ मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. पण, त्यातील केवळ ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्रीचा बहुमान मिळाला.

शिवाय, सिंधुताईंना पद्मभूषण द्यावे, अशी शिफारस राज्याने केली होती. मात्र, त्यांना पद्मश्रीने गौरविले जाणार आहे. केंद्राने केवळ एकाच नावाला पंसती दिली असून इतर ९७ व्यक्तींना यंदा तरी पद्म पुरस्कारासाठी नाकारले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह विविध मान्यवरांचा या यादीत समावेश होता.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह ७ जणांना पद्मविभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. दिवंगत गायक एस पी बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करण्यात आला आहे.

सोबतच दहा जणांना पद्मभूषण आणि १०२ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर) यांच्यासह तारलोचन सिंह, रजनीकांत श्रॉफ, कालबे सादिक (मरणोत्तर), केशूभाई पटेल (मरणोत्तर), नृपेंद्र मिश्रा, चंद्रशेखर कांबरा, तरुण गोगई (मरणोत्तर), कृष्णन नायर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना ‘पद्मश्री’ घोषित; भावना व्यक्त करताना अश्रू अनावर, म्हणाल्या…
रोहित पवारांच्या ‘त्या’ फोटोंनी सोशल मिडीयावर घातला धुमाकूळ; भाजपनेही केली जहरी टीका..
“कोणी किती मोठ्या बापाचा असो किंवा छोट्या बापाचा, मला देणेघेणे नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.