दिवाळीबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी; सरकारने सांगितले ‘हे’ नियम

मुंबई | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून सणांवर निर्बंध घालण्यात आले आहे. याचबरोबर सर्वात मोठा आणि आनंदाचा सण असलेल्या दिवाळीवर देखील यंदा कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या संकटात दिवाळी कशी साजरी करावी यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

दिवाळी प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा केला जावा, आवाजाचा उत्सव म्हणून नाही, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. याचबरोबर दिवाळी यंदा साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करतानाच अनेक महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना
दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे, असे सांगण्यात आले आहे.

याचबरोबर, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नाही त्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे संबंधित विविध विभाग तसेच महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी जारी केलेल्या नियमांचे पालन सर्वांसाठी बंधनकारक असल्याचे देखील यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्यांनी दुसऱ्या धर्मातील मुलींशी लग्न केले आहे
३० वर्ष बॉलीवूडमध्ये असूनही गोविंदासोबत ‘असे’ वागतात बॉलीवूडचे कलाकार
अरबाझसोबत घटस्फोट का घेतला? मलायकाने सांगीतली अनेक धक्कादायक कारणे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.