राज्य सरकारची केंद्राशी चर्चा; आता शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर!

 

मुंबई | देशभरात या कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे.   या पार्श्वभूमीवर काही महिन्यापासून राज्यातील सर्व शैक्षणिक विभाग बंद आहे. जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या शाळा अजूनही बंद आहे.

आता कोरोनाची परिस्थिती बघता शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. यासाठी राज्य शासन केंद्राशी चर्चा करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बाबत शिक्षण विभागाला सूचना दिल्या आहे.

तसेच केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी तज्ञांची एक समिती नेमण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

शैक्षणिक धोरणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली आहे. बैठकीत १०० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन, ऑफलाईन जसे शक्य होईल तसे शिक्षण मिळाले पाहिजे.

तसेच शिक्षण विभागाने यातील सर्व अडचणी, उणिवा दूर कराव्यात, सोबत शिक्षकांची उपस्थिती तपासावी. विद्यार्थ्यांना यात प्रत्यक्षात काय अडचणी येत आहे, त्याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या आहे.

दरम्यान, येत्या आॅक्टोबरमध्ये शैक्षणिक व्यवस्थेबाबत आढावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या बैठकीत दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.