राज्यात ‘करोना’चा हाहाकार! राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नवे नियम

मुंबई : करोना पुन्हा एकदा सोकावत असल्याचे दिसत आहे. राज्यात रुग्णवाढीचा वाढता आलेख कायम असून, दिवसेंदिवस तो आणखी वर सरकू लागला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये संसर्ग होण्याचं प्रमाण वाढल्याने राज्य सरकारने कोरोनाबाबत नव्या नियमावली जाहीर केल्या आहेत.

तसेच राज्य सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार सर्व सिनेमागृहे, हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने कार्यरत राहतील. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील. शॉपिंग मॉल्समध्ये देखील मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील.

मॉल व्यवस्थापनाने मॉलमधील सिनेमागृह आणि रेस्टॉरंट नियम पाळत आहेत याची खात्री करावी. कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणांसाठी एकत्र येण्यास मनाई असेल. तसे झाल्यास ज्या जागी असे कार्यक्रम होतील, त्या जागेच्या मालकावर कारवाई केली जाईल.

याचबरोबर लग्नकार्यामध्ये ५० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही. नियम मोडल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. अंत्यविधींसाठी २० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नसेल.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व कार्यालये ५० टक्के कर्मचारी क्षमतेनंच सुरू राहतील. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

चाहत्यांना धक्का, इशान किशन आणि सुर्यकुमार मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाहीत

चाहत्यांना दिसला नेहा कक्करचा कातिलाना अंदाज; फोटो पाहून तुम्हीही व्हाल पागल

मी आता दारू पितो अन् पार्ट्या करतो, मी आता भ्रष्ट झालोय; गोविंदाच्या कबुलीने बाॅलीवूड हादरले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.