स्टेट बँकेची भन्नाट ऑफर; एक तासात घरबसल्या मिळणार मुद्रा लोन; ‘असा’ करा अर्ज

 

मुंबई | व्यवसाय सुरू असताना किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असते. तसेच आता कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. यामुळे आर्थिक संकटात आणखी भर पडली आहे.

आता या पासून सुटका मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार मुद्रा लोन योजना (Mudra Loan Scheme) राबवत आहे. या योजनेमुळे छोट्या उद्योगांचा विकास करता येणार आहे, त्यामुळे छोटे उद्योजक आणि व्यवसायिकांसाठी ही योजना अत्यंत उपयोगी असणार आहे.

सध्या सरकारची ही योजना खूप लोकप्रिय झाली आहे. तसेच अनेक उद्योजकांनी आणि व्यवसायिकांनी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी या योजनेचा लाभ देखील घेतला आहे.

छोट्या व्यवसायिकांना ५० हजार रुपयांचे कर्ज या योजनेतून सहज मिळते. भारतीय स्टेट बँक (SBI) देशातील छोट्या व्यापाऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत दहा मिनिटांत १० हजार रुपये ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पुरवत आहे.

तसेच मुद्रा लोन योजनेचा लाभ तुम्हाला घायचा असेल तर तुम्ही तो घरी बसून घेऊ शकतात. तुम्ही घरी बसून लोनसाठी अर्ज करू शकतात आणि ५९ मिनिटात कर्ज मिळवू शकतात.

दरम्यान, यासाठी आपल्याकडे ओळखपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, बँकेचे स्टेटमेंट, फोटोग्राफ, कोटेशन्स बिझनेज ओळख पत्र, आणि पत्ता इत्यादी कागदपत्रांची गरज असणार आहे.

तसेच दिलेल्या कागदपत्रांसोबत जीएसटी आयडेंटीफिकेशन नंबर, आयकर विभाग रिटर्नची माहिती द्यावी लागणार आहे. एसीबीआयच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.