‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने आपल्या लग्नात जे केलं ते वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल

गेल्या अनेक महिन्यांपासून कलाकारांच्या साखरपुड्याच्या आणि लग्नाच्या बातम्या ऐकायला मिळतात. त्यात अजून एका अभिनेत्रीची भर पडली आहे. झी युवा वाहिनीवरील ‘लव लग्न लोचा’ मालिकेतील आणि ‘चिंतामणी’ चित्रपटातील अभिनेत्री रुचिता जाधव हिचा विवाहसोहळा नुकताच संपन्न झाला.

रुचिता जाधव हिने उद्योगपती आनंद माने यांच्याशी ३ मे रोजी पाचगणी येथे विवाहसोहळा पार पडला. कोरोनाच्या परिस्थितीचे भान ठेऊन मोजक्याच लोकांच्या उपस्थित लग्न पार पडले. रुचिताने लग्नाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हणाली ‘हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता’.

सोशल मिडीयावर फोटो शेअर करत तिने एक पोस्ट लिहिली त्यात तिने तिच्या भावना व्यक्त केल्या, ती म्हणते प्रत्येक मुलीसाठी लग्न ही खूप मोठी गोष्ट असते. आमच्या लग्नाचे कार्यकम सर्व नियम आणि अटींच पालन करून पार पडल. पहिल्या दिवशी साखरपुडा आणि मेहंदी चा कार्यकम झाला.

साखरपुड्यामध्ये आनंदने मला ती अंगठी गिफ्ट केली जी मला १३ वर्षांपूर्वी आवडली होती. ही गोष्ट त्याला माझ्या मैत्रींकडून कळाली. त्याने कशाचाही विचार न करता त्याच डिझाइनची अंगठी मला घातली. दुसऱ्या दिवशी आम्ही एकमेकांशी लग्नगाठ बांधली.

https://www.instagram.com/ruchitavijayjadhav/?utm_source=ig_embed

रुचिता आणि आनंदच्या लग्नसोहळ्यामध्ये संगीत कार्यक्रम देखील होणार होता. परंतु त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला. त्याऐवजी त्यांनी डाळ आणि तांदुळाची १५०० पाकीटे पाचगणीच्या परिसरात असलेल्या खेड्यांमध्ये वाटून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली.

त्याबाबत रुचिताने सांगितले, ‘ किमान इतकी तरी मदत आम्ही नक्कीच करू शकणार होतो. त्यामुळे आम्ही या गावात जाऊन प्रत्येक व्यक्तीला अडीच किलो तांदूळ आणि अडीच किलो डाळ वाटली. लग्नाचे फोटो रुचिताने सोशल मिडीयावर शेअर केल्याने चाहत्यांनी तसेच मित्र परिवाराने शुभेच्छाचा वर्षाव केला.

हे ही वाचा-

प्रेमासाठी वाटेल ते! लग्नात नवरदेवानेही घातले गळ्यात मंगळसूत्र; वाचा अनोख्या लग्नाची कहाणी..

मोठी बातमी! अभिनेत्री कंगना रणावतला कोरोनाची लागण, स्वतः दिली माहिती

भारताच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या मोठ्या व्यक्तिने राजकारणाला ठोकला रामराम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.