तमिळनाडूमध्ये विजयी झालेल्या स्टॅलीन यांनी राज ठाकरेंना दिले ‘हे’ आश्वासन

मुंबई | देशात कोरोनाच्या काळात पाच राज्यांच्या निवडणूका पार पडल्या. निवडणूकांचा निकाल काल (दि २) जाहीर झाला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी आपली सत्ता कायम राखली. तर तमिळनाडूमध्ये १० वर्षे सत्तेत असलेल्या अण्णा द्रमुक पक्षाला डीमके पक्षाने सत्तेपासून खाली खेचले.

द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी निवडणूक जिंकण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. एम के स्टॅलिन हे तमिळनाडूचे ५ वेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान राहिलेले करूणानिधी यांचे सुपुत्र आहेत. २०१६ च्या निवडणूकीत करूणानिधी यांना म्हणावे तसे यश मिळाले नव्हते.

आता २०२१ च्या निवडणूकीत १० वर्ष सत्तेत असलेल्या अण्णा द्रमुकचा पराभव केल्यानंतर स्टॅलिन हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे. स्टॅलिन यांच्या विजयानंतर राज्यातील अनेक  नेत्यांनी स्टॅलिन यांचे कौतूक केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत स्टॅलिन आणि त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांच अभिनंदन केले आहे. “तमिळनाडू विधानसभेत स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमके पक्षाने मिळवलेल्या विजयााठी स्टॅलिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन”.

“भाषिक आणि प्रांतिक अस्मितेच्या राजकारणाला करूणानिधींनी कायमच प्राधान्य दिलं, हीच भूमिका तुम्ही देखील तितक्याच निष्ठेने पुढे न्याल आणि काही बाबतीत राज्यांच्या स्वायत्तेबद्दल आग्रही राहाल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन”. असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावर डीएमकेचे प्रमुख स्टॅलिन यांनीही रिट्विट करत राज ठाकरे यांचे आभार व्यक्त केले आहे. हो माझ्याकडून भाषिक समानता, प्रांतिक अस्मिता आणि राज्यांच्या स्वायत्तेला प्राधान्य देणं सुरूचं राहिल. असं आश्वासन स्टॅलिन यांनी दिलं आहे.

स्टॅलिन हे करूणानिधी यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. १ मार्च १९५३ रोजी त्यांचा जन्म झाला होता. स्टॅलिन यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं आहे. आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. करूणानिधी यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा स्टॅलिन यांनी सांभाळली आहे.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेंनी घेतली चांगली मत;पण पाहावे लागले पराभवाचे तोंड
हा तर रडीचा डाव; ममतांच्या पराभवानंतर शरद पवार भाजपवर भडकले
पंढरपुरमध्ये भाजपने केला राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम; भाजपचे समाधान अवताडे विजयी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.