मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराजवळ एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार यांच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला आहे.(st-workers-andolan-on-sharad-pavar-home)
काल मुंबई उच्च न्यायालयाने एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्वाचा निकाल दिला होता. कुठल्याही एस टी कर्मचाऱ्यावर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. तसेच एस टी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युईटी देण्याचे निर्देश देखील न्यायालयाकडून राज्य सरकारला देण्यात आले आहेत.
यादरम्यान आज एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आंदोलन केले आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या ठिय्या मांडला आहे. यावेळी काही आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काही आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक देखील केली.
तसेच आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या चपलांचे जोडे शरद पवार यांच्या घराच्या दिशेने फेकले. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने शरद पवार यांच्या घराकडे धाव घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराजवळ सुरक्षेच्या दृष्टीने पोळी फौजफाटा वाढवण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावेळी शरद पवार त्यांच्या घरी उपस्थित होते. पण सुरक्षेच्या दृष्टीने ते घराबाहेर आले नाहीत. शरद पवार यांच्या पत्नी देखील निवासस्थानी उपस्थित होत्या. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचीच कन्या देखील घरात हजर होती. पण पोलिसांनी त्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बाहेर पडू दिले नाही.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे शरद पवार यांच्या घराकडे तातडीने दाखल झाल्या. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलनकर्त्यांनी त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला. यावेळी आंदोलनकर्त्यांनि शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
महत्वाच्या बातम्या :-
”मनसे हा राजकीय पक्ष नसून गुंडाचा पक्ष, केवळ हिंदु मुसलमान दंगल घडविणे हेच उद्दिष्ट्य”
‘या’ पर्वतावर बनला आहे ओमचा आकार, दिवसरात्र येतो असा आवाज, जाणून घ्या जगप्रसिद्ध पर्वताचे रहस्य
आयुष्यात दोनच गोष्टी गरम हव्या, एक जेवण आणि दुसरी.., कंगनाच्या शोमध्ये अभिनेत्याची घसरली जीभ