एसटी महामंडळाला चूक मान्य; वारीचा धनादेश करणार परत

 

नाशिक | राज्य परिवहन महामंडळाने संत निवृत्तीनाथ पालखी शिवशाही बसने नेण्यासाठी ७१ हजारांचे बिल आकारले. त्यावरून तयार झालेल्या वादावर महामंडळाने आता पडदा टाकला आहे.

विभाग नियंत्रक नितीन मैड यांनी आगार प्रमुखांना याबाबत माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून चूक झाल्याचे मान्य केले आहे. आणि हा धनादेश परत करणार असल्याचेही सांगितले आहे.

मंगळवारी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकासह २० वारकरी शिवशाहीने पंढरपूरला गेले होते. यासाठी नाशिक एसटी डेपोने ट्रस्टकडून ७१ हजारांचे बिल आकारले.

राज्य परिवहन महामंडळ आणि ट्रस्टमध्ये या प्रकरणाबद्दल कोणताच वाद नव्हता, पण ही बातमी समजल्यावर विरोधी पक्ष आणि राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत टीका केल्यामुळे हे प्रकरण समोर आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.