MSRTC : एसटी म्हटलं की सर्वात सुखरूप आणि स्वस्त प्रवास. प्रवाशांचा प्रवास सुखरूप घडवून आणण्याची जबादारी ही एसटीच्या चालकाची असते. मात्र, याच एसटी चालकावर आता उपाशी राहण्याची वेळ आली आहे. वाढत्या महागाईच्या काळात एसटी महामंडळातील ८०० चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
एसटी महामंडळाने आजपासून म्हणजेच शनिवारपासून कंत्राटी चालकांची सेवा बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता महामंडळाकडून चालकांचा वापर कमी होत असल्याचे कारण देण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे या कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे.
२७ ऑक्टोबर २०२१ पासून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यानी संप पुकारला होता. त्यामुळे महामंडळाने एसटी सेवा बंद राहू नये व राज्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी टप्प्याटप्प्यात कंत्राटी पद्धतीने ८०० चालकांची नियुक्ती केली होती. एसटी कर्मचाऱ्यांचा संप उधळून लावणे हाही यामागचा उद्देश होता.
त्यानंतर एप्रिल महिन्यात त्यांचा संप मिटला व ते पुन्हा कामावर रुजू झाले. कंत्राटी चालकांना यावेळी मुदतवाढ देण्यात आली होती. एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानंतर संप काळात वाहतूक सुविधा सुरु राहायला हवी, या उद्देशाने काही चालकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर या नियुक्तीला सातत्याने वाढ देण्यात आली.
दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत कंत्राटी चालकांचा महामंडळात नगण्य वापर होत आहे. त्यामुळे महामंडळाने ३ सप्टेंबरपासून कंत्राटी चालकांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या वाहतूक विभागाकडून शुक्रवारी याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत.
कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपासून कामावर रुजू होण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ते कामावर रुजू झाले. त्यामुळे कंत्राटी चालकांचा वापर खूप कमी होत आहे. म्हणूनच महामंडळाने कंत्राटी चालकांची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
तंटामुक्तीचा अध्यक्षच पोलिसांनी केला तडीपार; जुन्नर तालुक्यातील घटनेने खळबळ
Bill Gates : कोरोना लशीमुळे तरूणाचा मृत्यू; बिल गेट्स आणि आदर पुनावालांवर कोर्टाची मोठी कारवाई
‘हॉलीवूड हे सर्वात मोठे वेश्यालय, पोर्नोग्राफीने माझे कुटुंब उद्ध्वस्त केले’, बड्या पॉर्नस्टारच्या नवऱ्याची पोस्ट व्हायरल
Eknath Shinde : शिंदेची महाविकास आघाडीला धोबीपछाड; शिंदेगट आणि भाजपचे तब्बल १२ आमदार वाढणार