बोनी कपुरच्या ‘ह्या’ गोष्टीमुळे मरणाआधी श्रीदेवी खूप दुःखात होती; चुलत्याचा मोठा खुलासा

२४ फेब्रुवारी २०१८ मध्ये बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांचा बाथ टबमध्ये बुडून मृत्यू झाला. श्रीदेवी यांचे अंकल वेणूगोपाल रेड्डी यांनी बरेच खुलासे केले आहेत. एका मुलाखतीच्या वेळी त्यांनी श्रीदेवी यांचे पती आणि त्यांची संपत्ती याच्याबद्दल अनेक खुलासे केले.

वेणूगोपाल म्हणाले की, श्रीदेवीने आपल्या हृदयात दुःख घेऊन या जगाला निरोप दिला. बोनी कपुरला काही चित्रपटात खूप नुकसान झाले होते त्यामुळे श्रीदेवीला आपली संपत्ती विकावी लागली होती. याचे दुःख श्रीदेवीला नेहमी होते.

फक्त लोकांना दाखवायला श्रीदेवी आपला चेहरा नेहमी हसरा ठेवत होती. पण आतून ती खूप दुःखी होती. बोनी कपूरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने श्रीदेवीला बळजबरीने परत चित्रपटात काम करावे लागले. तेव्हा त्यांनी इंग्लिश-विंग्लिश हा चित्रपट केला होता.

बोनी कपूरने अशा चित्रपटांवर पैसे लावले होते जे कधी प्रदर्शित झालेच नाहीत. त्याच्यामुळे बोनी कपूरला खूप नुकसान झाले आणि श्रीदेवीला पुन्हा चित्रपटात काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

वेणूगोपाल यांनी श्रीदेवी आणि त्यांची आई यांच्यातील संबंध कसे होते याच्याबद्दलही सांगितले. श्रीदेवी यांच्या आईला बोनी कपूर हे कधीही आवडले नव्हते. त्यांचा दोघांच्या लग्नाला विरोध होता.

बोनी कपुर जेव्हापण त्यांच्या घरी जायचे श्रीदेवींची आई त्यांच्याशी नीट वागत नसे. नंतर त्या दोघांनी लग्न केले होते. असे बरेच खुलासे वेणूगोपाल रेड्डी यांनी केले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.