क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! १८ शतक झळकवणाऱ्या ‘या’ फलंदाजासह १५ खेळाडू देश सोडणार

मुंबई | क्रिकेट जगतात मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. कारण श्रीलंका क्रिकेट संघाच्या १५ पेक्षा जास्त खेळाडूंनी देश सोडून जाण्याचा विचार केला आहे. हे खेळाडू अमेरिकन क्रिकेटसाठी खेळणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे श्रीलंका क्रिकेटचा सध्या वाईट काळ सुरू आहे. अशात श्रीलंकेच्या खेळाडूंनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या विरोधात बंड केले आहे. यानंतर क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. संघात योग्य संधी न मिळाल्याने तसेच कमी वेतनामुळे या खेळाडूंनी देश सोडण्याचा विचार केला आहे.

देश सोडून जाणाऱ्या खेळाडूंमध्ये श्रीलंकेचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज उपुल थरंगासोबत १५ खेळाडूंची नावं आहेत. हे खेळाडू पुढच्या महिन्यात अमेरिकेत जाणार आहेत. या खेळाडूंनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे.

या सर्व खेळाडूंनी संघात योग्य संधी नसल्याचा तसेच आर्थिक फायद्यासह श्रीलंकेत चांगले भविष्य नसल्याचे म्हटले आहे. गेल्या महिन्यातच ऑलराऊंडर शेहान जयसुर्याने अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला होता. आता उपुल थरंगा, दुष्यंत चमीरा, अमिला अपोंसो, दिलशान मुनवीरा, लहिरु मधुयशनका आणि निशान जेरीस या महत्त्वाच्या खेळाडूंनी हा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
सेटींग लागली! अखेर अर्जून तेंडूलकरला मुंबई इंडीयन्सने विकत घेतलंच
बाबो! ख्रिस मॉरिस ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, किंमत वाचून धक्का बसेल
मुंबई इंडियन्सने संघात सामील केल्यानंतर अर्जुन तेंडुलकरनं दिली प्रतिक्रिया, म्हणाला मी…
सोशल मिडियावर धुमाकूळ घालणाऱ्या श्वेताचे भन्नाट मिम्स व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.