फिक्सिंगमध्ये सापडलेला ‘हा’ खेळाडू पुन्हा खेळणार IPL; स्वत: BCCI नेच केली घोषणा

मुंबई | यंदाच्या आयपीएल लिलावासाठी खेळाडूंच्या नावांची नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाली आहे. या लिलावात आयपीपीएल २०१३ स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर बंदीवासात असलेल्या एस. श्रीसंतचा समावेश झाला आहे. तसेच महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि चेतेश्वर पुजारा हे या लिलावात सामील झाले आहेत.

दरम्यान, आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग केल्या प्रकरणी ७ वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर एस. श्रीसंतचा देखील यंदाच्या आयपीएल लिलावात समावेश करण्यात आला आहे. श्रिसंतची ७५ लाख इतकी बेस प्राइज ठेवण्यात आली आहे. तर कोसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची नवी वॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजारची बेस प्राइज ५० लाख रुपये आहे.

२०२१ च्या आयपीएल लिलावासाठी ८१३ भारतीय आणि ८३ परदेशी अशा एकूण १०८७ खेळाडूंचे नामांकन केले आहे.  यामध्ये अर्जुन तेंडुलकरचा समावेश आहे. या लिलावासीठी अर्जुनची मुळ किंमत ठरवण्यात आली आहे. या किंमतीपासून अर्जुनचा लिलाव होण्यास सुरुवात होईल.

लिलावासाठी अर्जुनची बेस प्राइज (मुळ किंमत) वीस लाख रुपये ठेवली आहे. या किंमतीच्या वर त्याची बोली लागेल. तसेच संघानी त्याला खरेदी करण्यास नापसंती दिल्यास कमीत-कमी बेस प्राइजवर म्हणजेच वीस लाखांमध्ये संघ त्याला आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या-
सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदा  IPL खेळणार; कमीत कमी ‘इतके’ लाख तरी मिळणारच
“विराट नाही, अजिंक्य रहाणेनेच कसोटी संघाचे नेतृत्व करावे”; माजी क्रिकेटपटूची मागणी
जिंकलस भावा! चुकला तरी संभाळून घेतो तोच खरा कर्णधार; मैदानावरील ‘त्या’ प्रसंगावर रहाणे म्हणाला..
बॉलिवूड विरुद्ध हॉलिवूड! या मुर्खांना कोणी काम दिलं? अमेरिकन अभिनेत्रीचा सवाल

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.