स्पृहा जोशीच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण; पतीसोबत फोटो शेअर करत दिल्या खास शुभेच्छा, पहा फोटो

मुंबई | मराठी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या कोणत्याच वादात पडत नाहीत किंवा त्या नेहमी चर्चेत नसतात. अशीच एक गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. आपल्या अभिनयाने तिने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

मोरया, पैसा पैसा अशा अनेक चित्रपटात तिने अनेक भूमिका साकारल्या आहेत. आज या प्रतिभावंत अभिनेत्रीच्या लग्नाचा वाढदिवस आहे. या निमित्ताने तिने आपल्या लग्नाचे फोटोस शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

तिने वरदसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, प्रिय वरद…आनंदी सहावा…या प्रवासासाठी मी खूप आभारी आहे, लव्ह यु. स्पृहाने दुसरा फोटो शेअर केला आहे यामध्ये असे दिसते की स्पृहाने लग्नाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच सेलिब्रेशन केले आहे.

अभिनेत्री स्पृहा जोशी आणि वरद लघाटे हे सहा वर्षे एकत्र होते त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २००८ पासून ते रिलेशनशिपमध्ये होते आणि अखेर त्यांनी २८ नोव्हेंबर २०१४ साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. वरदचा मराठी चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाही तो एका नामांकित वर्तमानपत्रात लेख लिहायचा.

तो पत्रकार आहे पण सध्या त्याने आपले क्षेत्र बदलले असून तो सध्या मार्केटिंग क्षेत्रात वळला आहे. स्पृहा जोशी सध्या कलर्स मराठी या चॅनेलवर सुरू असलेल्या सूर नवा ध्यास नवा- स्वप्न सुरांचे स्वप्न साऱ्यांचे या मालिकेत सूत्रसंचालनाचे काम करते. याआधीही तिने हे काम केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.