‘ब्राह्मण समाजाबद्दल चुकीची माहिती पसरवण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा ब्राह्मण होते’

नवी दिल्ली । काॅंग्रेसचे खासदार किर्ती आझाद यांनी एक वक्तव्य केले आहे. यामुळे आता राजकारण पेटले आहे. ते म्हणाले, देशातील ब्राह्मण समाजाबद्दल नेहमीच चुकीची माहिती पसरवण्यात आली. ब्राह्मण समाजाचा वापर केला गेला. सरकारने आणि नागरिकांनी कधीच ब्राह्मणांना समजून घेतले नाही.

एवढेच नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा ब्राह्मण होते, असेही ते म्हणाले. यामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. किर्ती आझाद यांच्या या वक्तव्याचे परिणाम वाईट होण्याची चिन्ह आहेत. राजकारण सध्या जातीच्या विषयावरून तापताना दिसत आहे.

ब्राह्मण आणि गैर ब्राह्मण वाद हा खूप जुना आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्या वडिलांनी ब्राम्हण हे विदेशी असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून देखील मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणावर भाष्य करताना किर्ती आझाद यांनी ब्राह्मण समाज आणि शिवाजी महाराज यांची तुलना केल्याने देशातील राजकारण चांगलेच पेटले आहे.

खासदार किर्ती आझाद यांनी छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मण असल्याचे वक्तव्य केले आहे. आता भाजपकडून जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरभंगाचे प्रतिनिधीत्व करणारे आझाद हे माजी क्रिकेटपटू आहेत. ते अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करतात. आता आझाद यांनी शिवाजी महाराज यांच्या बद्दल बोलल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.