मोठी बातमी! राजकारणात हालचालींना वेग, नाना पटोलेंना तातडीने दिल्लीत दाखल

मुंबई । केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कोरोना काळातील कामगिरीवर अनेक प्रकारचे आरोप लावले जात आहे. राजकारणात अनेक प्रकारचे आरोप प्रत्याआरोप एकमेकांवर केले जात असतात. आता राज्यातील राजकारणाला वेग आला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्याचा दौरा अर्धवट सोडून नाना पटोले दिल्लीला रवाना होणार आहे. नवी दिल्लीत काँग्रेसची शुक्रवारी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत येण्याचे पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले आहेत. नाना पटोले ३ दिवसांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्याचा दौरा अर्धात सोडून आज सायंकाळी नाना पटोले मुंबईला जाणार आहे. आज संध्याकाळीच मुंबईहून पुढे दिल्लीला रवाना होणार आहेत.

पावसाळी अधिवेशन येऊ घातले असून अद्याप विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित झाले नाही. त्यामुळे हे नाव निश्चित करण्यासाठी दिल्लीला जात असल्याचे पटोलेंनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या दिल्लीतच आहे.

दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते कमलनाथ आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शुक्रवारी काँग्रेसची बैठक होत आहे, दिल्लीतील हालचालीनंतर पटोले यांना दिल्लीत येण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे.

विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाल्यामुळे काँग्रेसमधून त्या जागी कुणाची निवड होणार यावर गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद देण्यात यावे, अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती. त्यामुळे राजकारणात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

ताज्या बातम्या

4 वर्षांच्या मुलीनं मागवलं ‘इतक्या’ हजारांचं ऑनलाईन फूड, बिल बघून बापाने लावला डोक्याला हात

Indian Idol 12; ट्रोल होत असलेल्या शण्मुखप्रिया बद्दल जावेद अख्तर यांनी केले धक्कदायक विधान, म्हणाले…

कुत्र्याची चेष्टा करणं तरुणाला भोवलं, अतिहुशार मुलाचा कुत्र्याने चावला हात, व्हिडीओ व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.