राज ठाकरे इन ॲक्शन; बालेकिल्ला सावरण्यासाठी नेमला ‘हा’ जुना व खास शिलेदार

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मनसेला धक्के बसत आहेत. मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत, तर आज मनसेचे नगरसेवक मंदार हळबेंनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनीही पक्ष सोडला आहे. यामुळे मनसेला मोठे खिंडार पडले आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. सोमवारीच डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज मनसेला दुसरा धक्का बसला आहे.

दरम्यान, कल्याण ग्रामीणचे आमदार राजु पाटील, नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांच्यासह मनसेचे मोठे नेते कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. राज ठाकरेंनी डोंबिवली शहराध्यक्ष पदाची जबाबदारी आता मनोज घरत यांच्यावर सोपवली आहे.

कोण आहेत मनोज घरत

मनोज घरत मनसेचे माजी नगरसेवक आहेत. तसेच मनसेचे कल्याण डोंबिवली महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना अध्यक्षपदी सध्या काम करत आहेत. आता त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अनुष्का शेट्टी नाही तर ‘या’ अभिनेत्रीसोबत प्रभास करणार आहे लग्न; पहा फोटो
धाडस म्हणावं कि स्टंटबाजी! ऊसतोड मजुराने बिबट्याच्या बछड्यासोबत काढले सेल्फी
रायगड किल्ल्यावरील तिकीट घराचा शिवप्रेमींनी केला कडेलोट; वाचा काय आहे कारण
शिवसेनेच्या ढाण्या वाघाची दिल्लीत डरकाळी; संजय राऊत पोहचले गाझीपूर बॉर्डरवर

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.