भारीच ना! वाढदिवसाच्या दिवशी सुपरस्टार धनुषने दिल चाहत्यांना खास गिफ्ट; आगामी ‘मारन’चा फस्ट लूक आला समोर

साउथ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता धनुषने २८ जुलैला आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. त्या दिवशी चाहत्यांनी, मित्र, नातेवाईकांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या. अनेकांनी त्याला गिफ्ट्सही देऊ केले असतील, परंतु धनुषने वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना एक अनोखी भेट दिली.

धनुषने वाढदिवसाच्या दिवशी दिग्दर्शक कार्तिक नरेन यांच्यासोबत चित्रपट करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्याच्या या चित्रपटाचे नाव ‘मारन’ असे आहे. त्याने सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत चित्रपटाची घोषणा केली आहे.

तसेच धनुष सोबतच चित्रपटाच्या निर्मात्यांनी देखील सिनेमाचा फस्ट लुक आणि सिनेमाच्या नावाची घोषणा केली आहे. निर्मात्यांनी पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, ‘तुमच्या सर्वांसमोर आमच्या आगामी चित्रपटाचा फस्ट लुक शेअर करताना आम्हाला आनंद होत आहे.#मारन’.

आपण पाहिलत तर या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये काचेवर कोणाचा तरी चेहरा फोडताना दिसत आहे. यासोबतच त्याच्या हातात आपल्याला चाकुही पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये धनुषच एकदम अग्रेसिव्ह रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. धनुषच्या या नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून त्याच्यावर शुभेच्छा आणि कौतुकाचे वर्षाव होत आहे.

या चित्रपटात आपल्यला धनुष सोबत अभिनेत्री मालविका मोहनन दिसणार आहे. हे दोख या चित्रपटानिमित्त पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. हा सिनेमा एक एक्शन थ्रिलर असून या वर्षाच्या शेवटपर्यंत प्रदर्शित होणार आहे. तसेच धनुषचा ‘जगमे थांधीराम’ हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

Raanjhanaa Official Trailer | Watch Full Movie On Eros Now - YouTube

धनुषने वयाच्या १९व्या वर्षी चित्रपटामध्ये पदार्पण केले आहे. साउथ इंडस्ट्री गाजवणाऱ्या धनुषने आनंद एल. राय यांच्या ‘रांझणा’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. धनुष लवकरच आपल्याला अक्षय कुमार आणि सारा अली खानसोबत आनंद एल. राय यांच्या ‘अतरंगी रे’ या सिनेमात दिसणार आहे.

हे ही वाचा-

हॉकीतील भारताच्या विजयाचे वर्णन करताना रडू लागले कॉमेंटेटर, पाहा भावूक करणारा हा व्हिडिओ

महसूल दिनानिमित्त मोठ्या बदलांची घोषणा, जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, जाणून घ्या नवीन बदल..

भुज चित्रपटातील नोराच्या जालिमा कोका कोला गाण्याने सोशल मिडीयावर घातला धुमाकूळ; पहा व्हिडिओ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.