सदावर्ते नीट बोल, माजुर्डेपणाची भाषा ऐकून घेणार नाही, विनोद पाटलांनी सदावर्तेना सुनावले

राज्यात मराठा आरक्षणावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केले असून यामुळे मराठा समाज नाराज झाला आहे. आता केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणप्रकरणी फेरविचार याचिका दाखल केली आहे.

मराठा आरक्षण याचिकेचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत केले. त्याच पार्श्वभूमीवर विनोद पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी विनोद पाटील आणि गुणरत्न सदावर्तें यांच्यात मोठी बाचाबाची झाली.

यावेळी गुणरत्न सदावर्ते नीट बोल, संविधानिक भाषेत बोल. माजुर्डेपणाची ही भाषा मी तोंडावर ऐकून घेणार नाही. कोणता अधिकार आहे, चार जणांकडून पैसे घेऊन मराठा आरक्षणाला विरोध करायचा. असे म्हणत विनोद पाटील चांगलेच भडकले.

तसेच ते म्हणाले, या माणसाचे आयुष्य ब्लॅकमेलिंगमध्ये गेले. हे आम्हाला काय ज्ञान शिकवणार, आमच्यात माज काढण्याची ताकद आहे. नीट बोल, असे म्हणत विनोद पाटील यांनी गुणरत्न सदावर्तेंना सुनावल.

तसेच मराठा आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. त्यांनी आम्हाला माजुर्डे म्हणायचे आणि आम्ही विरोध करायचा नाही हे योग्य आहे काय?, याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे का, हे ऐकणारी मराठ्याची औलाद नाही, अशा भाषेत विनोद पाटलांनी गुणरत्न सदावर्तेंना सुनावले आहे.

दरम्यान आरक्षण रद्द केल्यामुळे सध्या मराठा समाज रस्त्यावर उतरण्याच्या तयारी आहे. खासदार संभाजीराजे यांनी शांतता राखण्याचे आवाहन मराठा समाजाला केले आहे.

ताज्या बातम्या

बोल्ड आणि लव्ह मेकिंग सीनपूर्वी सनी लिओन मागते अभिनेत्यांचे एड्स रिपोर्ट, ‘हे’ आहे कारण

उत्तरप्रदेशात कोरोना चाचण्या निगेटीव्ह येण्यामागे आहे सरकारचा हा ‘झोल’; वाचून तुम्हीही हादराल

ही दोस्ती तुटायची नाय! मित्राच्या उपचारासाठी दोघा मित्रांनी दोन दिवसात जमा केले ३० लाख

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.