VIDEO: प्लास्टिक बाटल्यांच्या मदतीने पोहत आला दुसऱ्या देशात, सैनिकांनी पकडताच म्हणाला…

सध्या एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. बुधवारी(१९) ला रेकॉर्ड केलेला हा व्हिडिओ पाहून लोक भावुक झाले आहेत. व्हिडीओमध्ये एक मुलगा आपल्या कंबरेला रिकाम्या प्लॉस्टिकच्या बाटल्या बांधून समुद्राच्या पाण्यावर तरंगताना दिसत आहे. याशिवाय तो किनाऱ्यावर येण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

समुद्राच्या पाण्यात पोहोण्यासाठी मुलगा जोरदार संघर्ष करत आहे. किंचाळत आहे, रडत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील असहाय्यपणा स्पष्ट दिसत आहे. हा प्रवासी मुलगा स्पेन-मोरोक्को सीमेपासून स्पेनच्या उत्तर आफ्रिका क्षेत्रातील सिउटा येथे आला असल्याची माहिती मिळाली आहे.

व्हायरल होणाऱ्या भावुक व्हिडीओत दिसते की, जेव्हा हा मुलगा पाण्यातून बाहेर आल्यानंतर समोरच्या भिंतीवरुन शहरात जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याठिकाणी उपस्थित स्पॅनिश सैनिक त्याला ताब्यात घेतात. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मुलगा मोरोक्कोला जाण्याऐवजी मी मृत्यू पत्करणे पसंत करेन असे म्हणत होता. मोरोक्को सोडून स्यूटाला गेलेल्या ८००० स्थलांतरितांपैकी एक हा मुलगा आहे.

स्पॅनिश सैनिक राशिद मोहम्मद अल मेसोई याने त्या मुलाला नेले. यावेळी तो मुलगा म्हणत होता ‘तो परत जाऊ इच्छित नाही, त्याचे मोरोक्कोमध्ये कोणीही नाही. माझा थंडीमुळे मृत्यू झाला तरी त्याची मला काळजी नाही. मी मरेन पण मोरोक्को जाणार नाही.

रिपोर्ट्सनुसार, १७ मे रोजी मोरोक्कोने आपल्या सीमेवरील नियंत्रण शिथिल केले तेव्हा सीमा ओलांडण्यास इच्छुक असणाऱ्यांनी या संधीचा फायदा उठविला. परंतु ते सिउटा येथे पोहोचताच स्पॅनिश सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतले. खर तर स्पेन मोरोक्कोमध्ये राहणाऱ्या लोकांना निर्वासितांचा दर्जा देत नाही. केवळ कुटुंबाशिवाय अल्पवयीन मुले सरकारच्या देखरेखीखाली देशात राहू शकतात.

मोरोक्कनच्या एका बंडखोर नेत्याला स्पेनमध्ये उपचारासाठी परवानगी देण्यात आली. यानंतर मोरोक्को आणि स्पेन या दोन्ही देशांमधील संबंध बिघडू लागले आहेत. याचा अनेक लोकांना फटका बसला आहेत. निर्वासित लोकांचे या दोन्ही देशांच्या संबंधामुळे हाल होत आहेत. त्याचेच हे एक उदाहारण आहे.

महत्वाच्या बातम्या-
८ महिन्याची गरोदर महिला उचलतेय तब्बल १५० किलो वजन अन् करतेय हेवी वर्कआऊट; पहा व्हिडिओ
“मोदींनी प्रचारसभा घेऊन स्वत: कोरोना पसरवला, आणि आता रडत आहेत”
ह्या बाळाचा डान्स पाहून भले भले तोंडात बोट घालतील; गाणंही किती गोड गातय..; पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.