Mahesh Babu : तेलगु चित्रपटांचा सुपरस्टार म्हणून ओळखला जाणाऱ्या महेश बाबूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महेश बाबूची आई इंदिरा देवी यांचे निधन झाले आहे. २८ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजता हैदराबाद येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महेश बाबूची आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यांच्यावर हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले होते. मात्र, महेश बाबूच्या आईची तब्येत सतत खालावत गेली आणि २८ सप्टेंबरला त्या आपल्या परिवाराला सोडून गेल्या.
महेश बाबूचे वडील कृष्णा हे त्यांच्या काळातील तेलुगू चित्रपटांचे सुपरस्टार होते. त्यांचे इंदिरा देवी यांच्याशी लग्न झाले होते. मात्र, काही काळानंतर त्यांनी इंदिरा देवींना घटस्फोट देत अभिनेत्री विजया निर्मला यांच्याशी लग्न केले. परंतु, त्यानंतर इंदिरा देवींनी दुसरे लग्न केले नाही.
त्यांनी एकट्यांनीच सर्व मुलांचा सांभाळ केला. महेश बाबू हा आईच्या खूप जवळचा होता. आईच्या जाण्याने आता महेश बाबूचा आधार हरवला असल्याचे बोलले जात आहे. तसेच सोशल मीडियावर चाहत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
इंदिरा देवी या ७० वर्षांच्या होत्या. दुपारी १२ वाजेपर्यंत इंदिरा देवींचे पार्थिव पद्मालय स्टुडिओत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच २८ सप्टेंबर रोजी महाप्रस्थानम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
याच वर्षी महेश बाबूने त्याचा भाऊ रमेश बाबुलाही गमावले. त्यानंतर आता त्याची आई इंदिरा देवी त्याच्यापासून लांब गेली आहे. महेश बाबुने आपले सर्वात जवळचे व्यक्ती गमावल्याने त्याच्यावर एकामागून एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महत्वाच्या बातम्या
नवा चित्रपट फ्लॉप होताच महेश बाबूचा बदलला सूर; म्हणाला, बॉलीवूड चित्रपट करायला हरकत नाही
महेश बाबूला मिळाला धाकड कंगनाचा पाठिंबा, म्हणाली, त्याच्या पिढीने तेलुगू चित्रपट उद्योगाला..
बाप हा बाप असतो, बाॅलीवूड तुमचा बाप आहे; दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूला सुनील शेट्टीने सुनावले
महेश बाबू आधीपासूनच आहे ठाम, आतापर्यंत ‘या’ बॉलिवूड चित्रपटांना दिलाय साफ नकार, वाचा यादी