साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला करायचे आहे जसप्रीत बुमराहसोबत लग्न; म्हणते मी त्याच्यासाठी काहीही करेन…

साऊथ चित्रपटांतील अनेक अभिनेत्री सध्या खुप चर्चेत आहेत. त्यांच्या अभिनय कौशल्याने आणि सुंदरतेने त्यांनी लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. फक्त प्रेक्षकच नाही तर क्रिकेटपटू देखील साऊथ अभिनेत्रींच्या प्रेमात पागल झाले आहेत.

असेच एक नाव म्हणजे जसप्रीत बुमराह. आपल्या फास्ट बॉल्सने अनेकांची झोप उडवणाऱ्या जसप्रीत बुमराहची झोप एका अभिनेत्रीने उडवली आहे. ही अभिनेत्री बॉलीवूडमधील नसून साऊथमधील प्रसिद्ध चेहरा आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे अनुपमा परमेश्वरन.

असे बोलले जात आहे की जसप्रीत बुमराह आणि अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन एकमेकांना डेट करत आहेत. पण अजून या दोघांनी त्यांच्या नात्यावर कोणताही खुलासा केला नाही. ते दोघे गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

जसप्रीत बुमराह आणि अनुपमा यांची भेट हैद्राबादमध्ये एका कार्यक्रमात झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांशी बोलू लागले आणि यांच्यातील मैत्री वाढत गेली. हळूहळू या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला सुरुवात झाली.

अनेक वेळा हे दोघे एकमेकांना भेटत असतात. अनुपमाला ज्यावेळी तिच्या आणि जसप्रीत बुमराहच्या नात्याबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी तिने या गोष्टीला अफवा म्हणून सांगितले.

अनुपमाने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ती आणि जसप्रीत बुमराह खुप चांगले मित्र आहेत. त्या दोघांमध्ये फक्त मैत्रीचे नाते आहे. याशिवाय दुसरे काही नाही’. दुसरीकडे जसप्रीत बुमराह त्या दोघांच्या नात्यावर अजून काहीही बोलला नाही.

जसप्रीत बुमराहने ट्वीटर अनुपमाला फॉलो करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मात्र या अफवांमध्ये खुप जास्त भर पडला. कारण जसप्रीतने या अगोदर कधीही कोणत्याच अभिनेत्रीला सोशल मीडियावर फॉलो केले नव्हते.

त्यामुळे या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा मोठ्या प्रमाणात वाढल्या. अनुपमा साऊथमध्ये खुप प्रसिद्ध आहे. तिने २०१५ मध्ये तिच्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली होती. त्यानंतर खुप कमी वेळातच तिने साऊथमध्ये खुप जास्त प्रसिद्धी मिळवली.

महत्वाच्या बातम्या –

शाळेत डान्स करता करता अभिनय क्षेत्रात पोहोचली ‘ही’ अभिनेत्री; एअरपोर्टवर घालावल्या आहेत अनेक रात्री

अनिल कपूर श्रीदेवीला भेटल्यानंतर सर्वात पहीले त्यांच्या पाया पडायचे; कारण समजले तर तुम्ही थक्क व्हाल

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनायाने केला बिकनी फोटोशूट; पहा फोटो

सैफच्या बेडरुममधील ‘या’ वाईट सवयीला वैतागली आहे; करिना म्हणाली, मी झोपलेली असतानाही तो मला…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.