Share

VIDEO: साऊथच्या ‘या’ अभिनेत्याला पत्नीने हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं, दिला चपलेचा चोप

साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा भाऊ विजया कृष्ण नरेश सध्या खूप चर्चेत आला आहे. विजया कृष्ण नरेश(Vijya Krushna Naresh) हा एक अभिनेता आहे. त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. सध्या अभिनेता विजया कृष्ण नरेश त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. विजया कृष्ण नरेश चौथ्यांदा लग्न केल्याचे सांगितले जात आहे.(south actor naresh caught red-handed with his girlfriend in hotel video viral)

विजया कृष्ण नरेश यांनी कथित गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबत लग्न केल्याची माहिती मिळत आहे. यादरम्यान विजया कृष्ण नरेश वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता विजया कृष्ण नरेशची तिसरी पत्नी रम्या रघुपतीने एक हॉटेलमध्ये त्याच्यावर चप्पल उगारली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेता विजया कृष्ण नरेश अलीकडेच त्याची कथित गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबत म्हैसूरमधील एका हॉटेलमध्ये गेला होता. याबाबतची माहिती विजया कृष्ण नरेशची तिसरी पत्नी रम्या रघुपतीला मिळाली. त्यानंतर रम्या रघुपती तातडीने म्हैसूरमधील त्या हॉटेलमध्ये पोहचली. रम्या रघुपतीने आपल्या पतीला अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबत पाहिले.

https://twitter.com/Wishnuvv/status/1543485831888850944?s=20&t=vTGxCmzqc3xXgvvnqbsL9w

यामुळे रम्या रघुपती खूप संतापली. तिने आपल्या पायातील चप्पल हातात घेऊन आपल्या पतीला आणि अभिनेत्री पवित्रा लोकेशला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हॉटेलचे कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत अभिनेता विजया कृष्ण नरेश आणि अभिनेत्री पवित्रा लोकेश चप्पलने मारहाण होण्यापासून वाचवले.

विजया कृष्ण नरेशची पत्नी रम्या रघुपतीला हॉटेल कर्मचाऱ्यांनी शांत करत त्या ठिकाणाहून पाठवले. त्यानंतर पोलिसांच्या सुरक्षेमध्ये त अभिनेता विजया कृष्ण नरेश आणि त्याची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री पवित्रा लोकेश म्हैसूरमधील त्या हॉटेलबाहेर पडले. या वादग्रस्त घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

अभिनेता विजया कृष्ण नरेश हा साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा सावत्र भाऊ आहे. अभिनेता विजया कृष्ण नरेशने कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबत लग्न केल्याची चर्चा सध्या रंगत आहे. पण अभिनेता विजया कृष्ण नरेश याने अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबतच्या लग्नाच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच एकनाथ शिंदेंनी पेट्रोल-डिझेलबाबत केली मोठी घोषणा; म्हणाले…
भिकारी बोलत होता इंग्रजीत, नंतर वास्तव समोर आल्यानंतर सगळ्यांनाच बसला धक्का
फक्त १९ वर्षांचा आहे अंकित, पहिलाच मर्डर सिद्धू मुसेवालाचा, ‘असा’ आखला होता पुढचा प्लॅन

ताज्या बातम्या इतर मनोरंजन

Join WhatsApp

Join Now