नाबालिक मुलीसोबत लग्न करत होता साऊथचा ‘हा’ सुपरस्टार; पोलीसांनी थांबवले लग्न

आत्ताच्या घडीला बॉलीवूडचे कलाकार जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढेच प्रसिद्ध साऊथ इंडस्ट्रीतील कलाकार देखील आहेत. अभिनेते असो किंवा अभिनेत्री साऊथ इंडस्ट्रीतील प्रत्येक कलाकार आजकाल सगळीकडे हिट होत आहेत. अशाच एका अभिनेत्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

या अभिनेत्याचे नाव आहे ज्यूनिअर एनटीआर. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या सुपरस्टामध्ये ज्यूनिअर एनटीआरच्या नावाचा समावेश होतो. त्यांचे स्टारडम कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्यापेक्षा कमी नाही. ज्यनिअर एनटीआर ३८ वर्षांचे झाले आहेत.

त्यांनी आजपर्यंत त्यांच्या करिअरमध्ये एका पेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांचे आजोबा अंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री होते. तर वडील फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार होते. त्यामूळे अभिनय तर त्यांच्या रक्तात होता. एनटीआरच्या नावानेच चित्रपट हिट होतील असे त्यांचे स्टारडम आहे.

चित्रपटांसोबतच एनटीआर त्यांच्या वैयक्तिक आयूष्यामूळे देखील नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी लग्न केले त्यावेळी ते सर्वाधिक चर्चेत आले होते. कारण लग्नाच्या वेळी त्यांची पत्नी नाबालिक असल्याचे बोलले जात होते. जाणून घेऊया नक्की काय आहे पुर्ण किस्सा.

ज्यूनिअर एनटीआरने २०११ मध्ये लक्ष्मीसोबत लग्न केले होते. या लग्नासाठी त्यांच्या वडीलांना १८ करोड रुपये खर्च केले होते. त्यासोबतच लग्नात १० हजार लोकं आली होती. ज्यामूळे हे लग्न इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक होते.

एनटीआरचे स्टारडम खुप जास्त होते. म्हणून त्यांच्या लग्नात इंडस्ट्रीतील सुपरस्टार आले होते. त्यासोबतच अनेक मोठ्या नेत्यांना देखील लग्नाचे आमंत्रण होते. मुख्यमंत्री लग्नाला उपस्थित होते. पण लग्नात अडचणी आल्या जेव्हा पोलीस न बोलवता लग्नात आले.

लग्नात अचानक पोलीसांना पाहून एनटीआरसोबतच त्यांच्या कुटूंबाला देखील धक्का बसला होता. पण पोलीसांचे म्हणणे होते की, एनटीआर ज्या मुलीसोबत लग्न करत आहेत. ती नाबालिक आहे. तिचे १८ वर्ष पुर्ण झाले नाहीत ही गोष्ट ऐकताल लग्नातील सर्व लोकांना धक्का बसला.

पण ज्यूनिअर एनटीआरने परिस्थिती सांभाळून घेतली. त्यांनी पोलीसांना सांगितले की, ‘लक्ष्मीला १८ वर्ष काही दिवसांपूर्वीच पुर्ण झाले आहेत. त्यामूळे त्यांचे लग्न होत आहे’. त्यांनी पोलीसांना सगळे पुरावे आणि कागदपत्र दिले. पुरावे पाहील्यानंतर पोलीस निघून गेले आणि लग्न पार पडले.

महत्वाच्या बातम्या –
तीन वर्षात सलग तिसऱ्यांदा आई बनतीये बॉलीवूड अभिनेत्री; लोक म्हणाले, आत्ता तरी…
‘हम आपके है कौन’मध्ये माधूरी व रिमा लागूमध्ये असणारी ही मजेशीर गोष्ट माहितीय का? वाचून तुम्हीही हसाल
परवीन बॉबीला भेटण्यासाठी आलेला विदेशी चाहता कसा बनला बॉलीवूडचा खलनायक? वाचा बॉब क्रिस्टोची कहानी
जबरदस्त सेटींग असतानाही बॉलीवूडच्या ‘या’ स्टार किड्सने अभिनय क्षेत्रात न येता वेगळ्याच क्षेत्रात कमवले नाव व पैसा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.